Snehal Tarde : 'हिंदू नाही आपला धर्म सनातनी , हिंदू एक संस्कृती;' प्रवीण तरडेंच्या पत्नीने नेमकं काय सांगितलं?
Snehal Tarde : प्रवीण तरडे यांची पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका स्नेहल तरडेने नुकतच अध्यात्माविषयी आणि धर्माविषयी भाष्य केलं आहे.
Snehal Tarde : 'फुलवंती' (Phulwanti) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री स्नेहल तरडेने (Snehal Tarde) दिग्दर्शनात पाऊल ठेवलंय. स्नेहल ही प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची पत्नी आहे. स्नेहलने सिनेसृष्टीतून बराच काळ ब्रेक घेतला होता. या काळात स्नेहल अध्यात्माकडेही वळली. इतकच नव्हे तर तिने वेदांचा अभ्यास करत त्यामध्ये पदवीही संपादन केली आहे. नुकतच स्नेहलने एका मुलाखतीमध्ये हिंदू धर्माविषयी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे तिच्या अध्यात्माच्या अभ्यासाविषयीही सांगितलं आहे.
'मुलांना बालवयापासून अध्यात्माची गोडी'
आरपार या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्नेहलने म्हटलं की, मुलांना बालवयापासून अध्यात्माची गोडी लावायला हवी. अध्यात्म हे फक्त म्हाताऱ्या माणसांसाठी नाही. हल्लीच्या पिढीकडे सगळं आहे, पण तरीही त्यांचं मन सैरभैर आहे. त्यांच्या मनाला शांतता नाहीये. कारण ते त्यांच्या मूळाला धरुन नाहीयेत आणि ते त्यांच्या मूळाला धरुन नाहीयेत कारण त्यांचे पालक त्या मुळाला धरुन नाहीयेत. आजच्या जगण्याला अध्यात्म,वेद हे कसं संबंधित कसं असेल याचा अभ्यास पालकांचा नाहीये, हा दोष पालकांचाही नाहीये. या पद्धतीच इंग्रजांनी अशा उखडवून ठेवल्या आहेत. धर्म संपवायचा, भारतीय संस्कृतींसोबत अनेक संस्कृती होत्या, ज्या हळूहळू लयाला गेल्या. पण भारतीय संस्कृती अजूनही जिवंत आहे, कारण ती श्रेष्ठ आहे. कालानुरुप तिने स्वत:ला सिद्ध केलंय. ती सनातनी आहे,जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत ती असणार आहे. इतकं श्रेष्ठत्व तिच्यामध्ये आहे. पण असं श्रेष्ठत्व मूळापासून उखडून टाका.. या विचाराने अनेक पिढ्या तोडल्या गेल्या.
'हिंदू धर्माचे अनेक तुकडे झाले'
हिंदू धर्माविषयी बोलताना स्नेहलने म्हटलं की, हिंदू धर्माचे अनेक तुकडे झाले. मी इथे हिंदू धर्म म्हणतेय पण आपल्या धर्माचं नाव सनातनी हे लक्षात घ्यायला हवं. सनातनी हा शब्दही आपसकूपणे निघून गेलाय. आपण जर एखाद्या कॉलममध्ये धर्म लिहिताना हिंदू असं लिहितो, हिंदू ही संस्कृती आहे. आपल्या धर्माचं नाव सनातन आहे. पण सनातन असं आपण लिहित नाही. आपल्याला पद्धतशीरपणे हिंदू मराठा, हिंदू ब्राह्मण या वेगवेगळ्या जातींमध्ये तोडलं गेलंय. त्याच्यामध्ये आता द्वेष निर्माण झालाय. माझी मनापासून इच्छा आहे, की प्रत्येक जातीने एक व्हायला हवं. आपल्यात वेगळेपण आहे पण ते वेगळेपण आपण सेलिब्रेट करायला हवं. तर तो हिंदू धर्म टिकून राहिल आणि तो एकसंध राहिल. राजकीय भांडवलासाठी हे सगळं केलं जातंय.सत्तेसाठी राजकारण केलं जातंय आणि माणसं तोडली जातायत एकमेकांपासून..
ही बातमी वाचा :
लग्नानंतर नवं जोडपं निघालं देवदर्शनाला, अभिनेता पृथ्वीक प्रताप अन् प्राजक्ताचा दौरा सुरु