एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Phulwanti Marathi Movie : एनडी स्टुडिओमध्ये शुटींग, पेशवेकाळातील भव्यता, 'फुलवंती' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Phulwanti Marathi Movie : प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Phulwanti Marathi Movie : ‘अख्खा हिंदुस्थान गाजवला, आता पुण्याला नादावणार आपली फुला’ अशा ठसकेबाज तोऱ्यात आपल्या मनमोहक अदाकारीने, नृत्याच्या सुंदर आविष्काराने सर्वांना भुरळ पाडणारी 'फुलवंती' (Phulwanti Marathi Movie) आपल्या भेटीला येतेय. तिच्या येण्याची उत्सुकता शिगेला पोहचली असतानाच 'फुलवंती’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लक्ष वेधून घेतोय. ट्रेलरमध्ये ‘फुलवंती’च्या भूमिकेतील प्राजक्ता माळी आणि प्रकांडपंडीत व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री भूमिकेतील गश्मीर महाजनी यांच्यावरून नजर हटत नाही. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून उतरलेली ‘फुलवंती’ कादंबरी, चित्रपटस्वरुपात 11 ऑक्टोबरला आपल्यासमोर येणार आहे. 

‘फुलवंती’ ही भारतभर किर्ती असलेली नर्तिका;  कार्यक्रमाच्या निमित्तानं तिचं पुण्यात - पेशवे दरबारात येणं होतं. तिथे तिची व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री यांच्याशी भेट होते. त्यांच्या भेटीनंतर तिच्या आयुष्याला अनपेक्षित वळण लागतं. नृत्यांगना ‘फुलवंती’ आणि प्रकांडपंडीत ‘व्यंकट शास्त्री’ यांच्यातील पैज व आव्हानावर हा चित्रपट बेतला आहे. कला व बुद्धिमत्तेतील युद्ध आपण यात पाहणार आहोत. 

प्राजक्ताने काय म्हटलं? 

प्राजक्ता माळीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, उत्तम कथानक, नृत्य- संगीत, मराठी संस्कृती आणि पेशवेकाळातील भव्यता यांचा सुंदर मिलाफ असणारी ही कलाकृती रसिकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. मराठीत सिनेसृष्टीत नेहमीच उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन मीही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतेय, याचा मला आत्यंतिक आनंद आहे. प्रादेशिक सिनेमे आशयघन असतात, ही बाब मला फार आवडते. एका चांगल्या संकल्पने सोबतच ताकदीच्या कलाकारांची फौज, उत्तमोत्तम तंत्रज्ञ, संवेदनशील दिग्दर्शन आणि वेगळ्या धाटणीचा तरीही कौटुंबिक असणारा ‘फुलवंती’ हा चित्रपट लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आवडेल.'

सिनेमात हे कलाकार दिसणार

या दोघांसह या चित्रपटात; प्रसाद ओक, ऋषिकेश जोशी, स्नेहल तरडे, वैभव मांगले, मंगेश देसाई, जयवंत वाडकर, समीर चौघुले, चिन्मयी सुमित, सविता मालपेकर, विभावरी देशपांडे,  क्षितीश दाते, गौरव मोरे, वनिता खरात, रोहित माने, पृथ्वीक प्रताप, चेतना भट,विजय पटवर्धन, सुखदा खांडकेकर, अदिती द्रविड, निखिल राऊत, दीप्ती लेले, राया अभ्यंकर आदि मराठीतील कलाकारांची फौज दिसणार आहे.

 ‘फुलवंती’ मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांचे असून दिग्दर्शन स्नेहल प्रविण तरडे करीत आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी महेश लिमये यांनी सांभाळली आहे. कुमार मंगत पाठक,अभिषेक पाठक, मंगेश पवार, श्वेता माळी, प्राजक्ता माळी चित्रपटाचे निर्माते आहेत. अमोल जोशी प्रोडक्शन, मुरलीधर छतवानी,रविंद्र औटी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. सहाय्यक निर्माते विक्रम धाकतोडे आहेत. चित्रपटाच्या  संगीत वितरणाची जबाबदारी पॅनोरमा म्युझिकने सांभाळली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi Season 5 : मानधनाच्या बाबतीत सूरजला गुलीगत धोका? दिवसाचे फक्त 3 हजार रुपये; पण निक्कीने लाखोंची फी घेतली असल्याच्या चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रियाAditi Tatkare Win Vidhan Sabha Election | राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंचा दणदणीत विजय ABP MajhaRaju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
Amruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
काय झाडी, काय डोंगरवाल्या शहाजी बापूंचा पराभव; सांगोल्यातून शेकापचे बाबासाहेब देशमुख विजयी
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35  वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला जबर धक्का, 35 वर्षांची एकहाती असलेली सत्ता गमावली
Solaur vidhansabha : राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
राम सातपुतेंचा 6 महिन्यात दुसरा पराभव; मोहिते पाटलांची साथ ठरली 'उत्तम'; माळशिरसमधून जानकरांनी झेंडा रोवला
Man Vidhan Sabha Election Result 2024 :  जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
जयकुमार गोरे यांचा दणदणीत विजय, माणचे पुन्हा मानकरी, प्रभाकर घार्गेंचा पराभव करत विजयाचा चौकार मारला
Embed widget