Munawar Faruqui : 'लॉक अप' शो जिंकल्यानंतर डोंगरीमध्ये पोहचला मुनव्वर; चाहत्यांनी केलं जोरदार स्वागत
डोंगरीमध्ये मुनव्वरच्या (Munawar Faruqui) चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं.

Munawar Faruqui : काही दिवसांपूर्वी लॉक-अप (lockupp) या प्रसिद्ध कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पार पडला. अल्ट बालाजी आणि एमएरक्स प्लेअरवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या या शोमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. पण सर्वांना मागे टाकत कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं (Munawar Faruqui) लॉक अप या शोचं विजेते पद पटकवलं. या कार्यक्रमाचा विजेता झाल्यानंतर मुनव्वरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, 'ट्रॉफी डोंगरी येत आहे. आज 3.30 वाजता.' त्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरी येथे गेला. डोंगरीमध्ये त्याच्या चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं.
मुनव्वरचा डोंगरीमधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये मुनव्वरचे अनेक चाहते त्याच्या गाडी जवळ त्याच्या स्वागतासाठी आलेले दिसत आहे. मुनव्वरच्या हातात ट्रॉफी देखील दिसत आहे. या व्हिडीओला कमेंट करून अनेक नेटकऱ्यांनी मुनव्वरला शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
लवकरच या शोमध्ये भाग घेणार मुनव्वर
मुनव्वरला लॉक अप शो जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबतच 20 लाख रूपये देखील बक्षिस म्हणून मिळाले. आता हा शो जिंकल्यानंतर तो लवकरच खतरो के खिलाडी या शोमध्ये भाग घेणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी करतो.
हेही वाचा :
- Akshyaya - Hardik Engagement : तु्म्ही केलेलं प्रेम मी शब्दात मांडू शकत नाही..., अंजलीबाईंनी साखरपुड्याचा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मानले आभार
- Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
- Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
