Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम
Mi Honar Superstar : शुद्धी कदम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली आहे.
![Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम The winner of the Mi Honar Superstar Chhote Ustad was Shuddhi Kadam Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली ठाण्याची शुद्धी कदम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/08/6826d656df63f0da1f18ab72334e356e_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mi Honar Superstar Chhote Ustad : 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या (Mi Honar Superstar Chhote Ustad) महाअंतिम सोहळ्याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. ठाण्याची शुद्धी कदम (Shuddhi Kadam) 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली आहे.
महाराष्ट्रभरातून ऑनलाईन पद्धतीने झालेल्या निवड चाचणीतून या कार्यक्रमासाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. बच्चेकंपनीच्या सुरांची अनोखी मैफल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वात राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार, सायली टाक या सहा जणांमध्ये चांगलीच लढत पाहायला मिळाली.
View this post on Instagram
विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं आहे. विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबिय आनंदात आहेत. शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'च्या पहिल्या पर्वाचे परिक्षण सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि गायक सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे यांनी केले. तर अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि बालकलाकार अवनी जोशीने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली होती.
संबंधित बातम्या
Sonu Sood : भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूदची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला कोरोनाकाळात...
Dharmaveer : आनंद दिघे 'झुकेंगा नही साला' असे होते : उद्धव ठाकरे
Mahesh Tillekar : महेश टिळेकरांची पोस्ट चर्चेत; व्हिडीओ शेअर करत म्हणाले, 'मराठी प्रेक्षक गेले कुठे'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)