Entertainment News Live Updates 22 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' रिलीज होताच सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस; नेटकरी म्हणतायत, 'चित्रपट बघू नका, पैसे वाचवा'
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट काल (21 एप्रिल)प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाचा रिव्ह्यू अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 'किसी का भाई किसी की जान' हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेकांनी काही मजेशीर मिम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Audience In Theater watching 😭😭 #KKBKKJ // #SalmanKhan pic.twitter.com/y8tNjesaR3
— 𝐁𝐀𝐁𝐀 𝐘𝐀𝐆𝐀 (@yyaga18) April 21, 2023
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन
Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा कार्यक्रम सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार असल्याने या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतलं आहे.
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन; आपल्या माणसाची स्टंट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
Sukh Mhanje Nakki Kay Asta: मंगल करणार गौरीची मदत'; पाहा 'सुख म्हणजे नक्की काय असतं!' महाएपिसोडचा प्रोमो
Sukh Mhanje Nakki Kay Asta: सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. या मालिकेतील जयदीप आणि गौरी यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेत ट्वीस्ट येत असतात. लवकरच या मालिकाचा महाएपिसोड प्रेकांच्या भेटीस येणार आहे. या महाएपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिका रोमॅंटिक वळणावर; अरुंधती आशुतोषला म्हणणार का 'आय लव्ह यू'?
Aai Kuthe kay Karte Marathi Serial Latest Update : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांच्या यादीत 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचा समावेश करण्यात आला आहे. अरुंधती आणि आषुतोष नुकतेच लग्नबंधनात अडकले असून आता या मालिकेत रोमॅंटिक ट्रॅक सुरू आहे. अरुंधती आशुतोषला 'आय लव्ह यू' बोलणार का याकडे मालिकाप्रेमींचं लक्ष लागलं आहे.
View this post on Instagram
Mazhi Tuzhi Reshimgath: 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम अभिनेत्री चुलीवर भाजतीये भाकऱ्या; व्हिडीओ व्हायरल
Sheetal Kshirsagar: अभिनेत्री शीतल क्षीरसागरने (Sheetal Kshirsagar) छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं काही निगेटिव्ह भूमिका देखील साकारल्या आहेत. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेमुळे शीतल क्षीरसागरला विशेष लोकप्रियता मिळाली. शीतल क्षीरसागर ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर (Social Media) शेअर करते. शीतलच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकतात शीतलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
