(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shiv Thakare : 'खतरों के खिलाडी'साठी शिव ठाकरेने घेतलं तगडं मानधन; आपल्या माणसाचे स्टंट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
Khatron Ke Khiladi : 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार आहे.
Shiv Thakare Khatron Ke Khiladi Fees : रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) 'खतरों के खिलाडी' (Khatron Ke Khiladi) हा कार्यक्रम सध्या वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू होणार असल्याने या पर्वात कोणते स्पर्धक असतील याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमात शिव ठाकरे (Shiv Thakare) सहभागी होणार असून या कार्यक्रमासाठी शिव ठाकरेने तगडं मानधन घेतलं आहे.
'खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होणार आहे. आता मराठीसह हिंदी 'बिग बॉस' (Bigg Boss) गाजवणारा शिव ठाकरे 'खतरों के खिलाडी 13'मध्ये सहभागी होणारा पहिला स्पर्धक असल्याचं समोर आलं आहे.
View this post on Instagram
'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी नव्या पर्वातील स्पर्धकांमध्ये शिव ठाकरेच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. शिव ठाकरेच 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) विजेता असणार होता. पण काही कारणाने तो विजेता होऊ शकला नाही. 'बिग बॉस 16'नंतर लगेचच शिवला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारणा झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यास शिवनेदेखील होकार दिला.
'खतरों के खिलाडी 13'साठी शिव ठाकरेने किती मानधन घेतलं? Khatron Ke Khiladi Shiv Thakare Fees)
'खतरों के खिलाडी 13'च्या स्पर्धकांमधील शिव ठाकरे सर्वात महागडा स्पर्धक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शिव ठाकरेची लोकप्रिय लक्षात घेत 'खतरों के खिलाडी'च्या निर्मात्यांनी त्याला चांगलच मानधन दिलं आहे. एका एपिसोडसाठी त्याने 5-8 लाख रुपये घेतले आहेत".
'बिग बॉस 16'च्या घरातील शिव ठाकरे उत्कृष्ट खेळाडू होता. त्याची खेळी रोहित शेट्टी आणि निर्मात्यांच्या पसंतीस उतरली आणि लगेचच त्यांनी त्याला 'खतरों के खिलाडी 13'साठी विचारलं. बिग बॉसच्या घरातील टास्क शिवने चांगले खेळले आहेत. 'आपला माणूस' म्हणून ओळख असलेला शिव अल्पावधीतच लोकप्रियता शिखरावर पोहोचला आहे. आता 'खतरों के खिलाडी 13' तो कसं खेळतो याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या