VIDEO : जेव्हा उदित नारायण यांनी स्टेजवरच श्रेया घोषाल अन् अलका याज्ञिक यांनाही केलं होतं KISS...; जुना व्हिडीओ व्हायरल
Udit Narayan Kissing Video : उदित नारायण यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांनी किस करताना दिसत आहेत.

Udit Narayan Kissing Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण सध्या वादात सापडले आहेत. लाईव्ह शोमध्ये महिला चाहत्यांना किस केल्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. त्यांनी लाईव्ह शोमध्ये 4 महिला चाहत्यांना किस केलं, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकंच नाही, तर त्यांनी एक महिला चाहतीच्या ओठांवर किस केलं. ही घटना कॅमेऱ्यात चित्रित झाली असून त्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. दरम्यान, उदित नारायण यांचा आता जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते गायिका श्रेया घोषाल आणि गायिका अलका याज्ञिक यांनी किस करताना दिसत आहेत. या व्हिडीओमुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला जात आहे.
उदित नारायण यांनी श्रेया अन् अलका यांनाही केलं होतं किस
उदित नारायण यांचा श्रेया घोषाल आणि अलका याज्ञिक यांना किस करतानाचा जुना व्हिडीओ सध्या नव्याने चर्चेत आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये उदित नारायण स्टेजवर उभे आहेत आणि तिथे श्रेया घोषाल पुरस्कार स्वीकारण्यासाठी येते. यावेळी उदित नारायण अचानक श्रेयाच्या गालावर किस करतात. उदित नारायण यांचं हे वर्तन श्रेयाला हे अपेक्षित नव्हतं, हे तिच्या चेहऱ्यावरी हावभावावरुन स्पष्टपणे दिसून येते, म्हणून ती क्षणभर स्तब्ध होते. अशाच प्रकारे, उदित यांनी एका कार्यक्रमात स्टेजवर शेजारी उभ्या असलेल्या अलका याज्ञिक यांनीही अचानक किस केलं होतं, यामुळे त्याही स्तब्ध झाल्या होत्या.
उदित नारायण यांचा जुना व्हिडीओ व्हायरल
View this post on Instagram
महिला चाहत्यांना किस केल्याने उदित नारायण ट्रोल
उदित नारायण यांच्या लाईव्ह शो दरम्यान एका महिला चाहत्याला किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. या व्हिडीओवर युजर्सही खूप प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं आहे, 'उदित हाश्मी.' दुसऱ्याने कमेंटवर त्याच्यावर निशाणा साधताना म्हटलंय, 'काळाच्या बरोबरीने चालणे!' आणखी एका युजरने लिहिलंय, 'त्याला ट्रेंडमध्ये कसं राहायचं हे माहित आहे.' काही नेटकरी त्यांना 'ठरकी नारायण' असेही म्हणत आहेत.
महिला चाहत्याच्या ओठांवर किस
उदित नारायण यांनी अलीकडेच त्यांच्या एका कार्यक्रमात एका महिला चाहत्याच्या ओठांवर किस केलं, ज्यामुळे खळबळ उडाली. त्या महिला चाहत्याने सर्वात आधी त्ंयाच्या गालावर किस केलं, पण यानंतर उदित यांनी जबरदस्ती तिच्या ओठांवर किस केलं. हा व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाला. यानंतर सर्वत्र उदित नारायण यांच्यावर टीकेची झोड उडाल्याचं दिसत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO : टिप टिप बरसा पानी, एक दोन नव्हे, 4-4 महिलांना लाईव्ह शोमध्ये KISS, उदित नारायण यांचं कृत्य बघून लोक म्हणाले, "हे तर इम्रान हाश्मी"!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

