एक्स्प्लोर

Telly Masala : अखेर जब्याला काळी चिमणी गावली ते बाहुबलीनं धुडकावली किंग खानची ऑफर; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी दररोज वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

अखेर जब्याला काळी चिमणी गावली! अभिनेत्री राजश्री खरातनं गुपचूप उरकलं लग्न? सोशल मीडियावर पोस्ट केला खास फोटो

या फोटोला तिने काहीही कॅप्शन दिलेलं नाही. मात्र, राजेश्वरी आणि सोमनाथ यांचा लग्नमंडपातील फोटो पाहिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: बाहुबलीनं धुडकावली किंग खानची फिल्म; मोठ्ठं कारण देत प्रभासनं नाकारली शाहरुख खानसोबतची ब्लॉकबस्टर ऑफर

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: बॉक्स ऑफिसवरचा (Box Office) सर्वात गाजलेला आणि ब्लॉकबस्टर (Block Buster) ठरलेला सिनेमा म्हणजे, बाहुबली (Bahubali). त्यानंतर या चित्रपटातील स्टारकास्टची देखील जोरदार चर्चा झाली. चित्रपटात लीडरोलमध्ये झळकलेला साऊथ स्टार प्रभास (Prabhas) तर लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. त्यानंतर प्रभासनं इतरही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. पण, प्रभासनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) ऑफर मात्र धुडकावली. धक्का बसला ना? बाहुबली फेम प्रभासनं शाहरुख खानच्या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. अख्खी इंडस्ट्री ज्याच्यासोबत फिल्म करण्यासाठी काहीही करायला तयार असते, त्या शाहरुख खानसोबतच्या चित्रपटाची ऑफर प्रभासनं धुडकावून लावली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

कार्तिक आर्यन नाही, तर 4 वर्षांपूर्वी जग सोडून गेलेल्या 'या' अभिनेत्याला होती 'भूल भुलैया 2'साठी निर्मात्यांची पहिली पसंती

Kartik Aaryan, Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa 3) हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. पण जेव्हा निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच, पार्ट 2 बनवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मात्र, अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) साईन करण्यात आलं. पण तुम्हाला माहितीय का? भूल भुलैयासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कार्तिक आर्यनला कधीच नव्हतीच. सध्या हयात नसलेल्या एका अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारलं होतं, पण त्यानं नकार दिल्यामुळे कार्तिकची निवड करण्यात आली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : विवियन डिसेनाच्या बाजूने शिल्पाचं झुकतं माप, ठरला नवा 'टाइम गॉड'; करणवीर मेहराला जोरदार झटका

Bigg Boss 18 New Time God : बिग बॉस 18 च्या घरात नवा टाईम गॉड होण्यासाठी विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस 18' मध्ये दररोज नाती बदलताना दिसत आहे. नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्यानंतर 8 सदस्य घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यानंतर नवा 'टाइम गॉड' होण्यासाठी घरातील सदस्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली. विवियन डिसेना आणि करणवीर मेहरा यांच्यात अखेरची लढत झाली. या कार्यात करणवीर मेहरा आणि विवियन डिसेना यांच्यात बाचाबाती झाली आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

नेटफ्लिक्सवरची 'दो पत्ती' जुनीच? काजोल, क्रिती सेनॉनचा चित्रपट 19 वर्षांपूर्वी आलेल्या 'या' फ्लॉप चित्रपटाची कॉपी?

Netflix movie Do Patti : Kajol आणि Kriti Sanon चा नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाबाबत आता नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या चित्रपटात क्रिती सेनन डबल रोलमध्ये दिसली होती. तर काजोल या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर, टेलिव्हिजन स्टार शहीद शेख लीड रोलमध्ये असून त्यानं क्रीती सेननच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासूनच या चित्रपटाबाबत चर्चा सुरू झालेल्या. नेटकऱ्यांकडून असं म्हटलं जात होतं की, हा चित्रपट 19 वर्षांपूर्वी फ्लॉप ठरलेल्या चित्रपटाचीच कॉपी आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

South Indian Film: हातात श्रीरामाची मूर्ती, 'कांतारा'फेम कलाकाराच्या नव्या लुकची एकच चर्चा, त्रेतायुगापासून कलीयुगापर्यंत प्रवास उलगणार 'जय हनुमान'

 Jai Hanuman : कन्नड सिनेमाचा दमदार अभिनेता ऋषभ शेट्टी आपल्या कांतारातील भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर ठसला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता त्याच्या जय हनुमान या त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचा पहिला लुकही समोर आला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर या सिनेमाची घोषणा करत या अभिनेत्यानं आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. त्यानं इंस्टाग्रॅमवर आपल्या या नव्या सिनेमाचा लुकही टाकलाय. यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रीया त्याला मिळत आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Dhangekar Join Shiv Sena | काँग्रेसला दे धक्का! रविंद्र धंगेकर यांच्या हाती धनुष्यबाणSpecial Report | Raj Thackeray Statement | कुंभस्नानावरुन वक्तव्य, वादाचा मेळा; संत-मंहतांची नाराजीRajkiya Shole | Special Report | Beed Crime | बीड जिल्ह्यात किती बॉस? किती आका? गुंडांना अभय?Rajkiya Shole | Special Report | Shinde Vs Thackeray | पाहिले न मी तुला, मर्सिडीजचे भाव, टोमण्यांंचा घाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मार्च 2025 | सोमवार
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
धक्कादायक! रायगड जिल्ह्यात 2 खुनाच्या घटना; काळ्या बॅगेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Harshvardhan Sapkal on Ravindra Dhangekar : धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
धंगेकर कोण होतास तू, काय झालास तू...; काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर प्रदेशाध्यक्षांची बोचरी टीका
Embed widget