एक्स्प्लोर

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: बाहुबलीनं धुडकावली किंग खानची फिल्म; मोठ्ठं कारण देत प्रभासनं नाकारली शाहरुख खानसोबतची ब्लॉकबस्टर ऑफर

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: प्रभास हा साऊथ इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांपैकी एक. अनेक चित्रपटांमध्ये प्रभासनं आपल्या अभिनयानं ठसा उमटवला आहे. अनेक निर्माते प्रभाससाठी मोठी रक्कम मोजायला तयार असतात. पण, आता त्यानं थेट किंग खानची ऑफर नाकारल्यामुळे चर्चा रंगल्या आहेत.

Prabhas Rejected Shah Rukh Khan Film: बॉक्स ऑफिसवरचा (Box Office) सर्वात गाजलेला आणि ब्लॉकबस्टर (Block Buster) ठरलेला सिनेमा म्हणजे, बाहुबली (Bahubali). त्यानंतर या चित्रपटातील स्टारकास्टची देखील जोरदार चर्चा झाली. चित्रपटात लीडरोलमध्ये झळकलेला साऊथ स्टार प्रभास (Prabhas) तर लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. त्यानंतर प्रभासनं इतरही अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे केले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. पण, प्रभासनं बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची (Shah Rukh Khan) ऑफर मात्र धुडकावली. धक्का बसला ना? बाहुबली फेम प्रभासनं शाहरुख खानच्या चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. अख्खी इंडस्ट्री ज्याच्यासोबत फिल्म करण्यासाठी काहीही करायला तयार असते, त्या शाहरुख खानसोबतच्या चित्रपटाची ऑफर प्रभासनं धुडकावून लावली आहे. 

प्रभास हा साऊथ इंडस्ट्रीमधील बड्या कलाकारांपैकी एक. अनेक चित्रपटांमध्ये प्रभासनं आपल्या अभिनयानं ठसा उमटवला आहे. अनेक निर्माते प्रभाससाठी मोठी रक्कम मोजायला तयार असतात. त्यामुळेच त्याच्या चित्रपटांचं बजेट खूप मोठं असतं. साऊथचा यशस्वी अभिनेता असूनही प्रभासनं आजपर्यंत एकाही बॉलिवूड चित्रपटात काम केलेलं नाही. अलिकडेच पठाणच्या दिग्दर्शकानं प्रभासला एका आगामी बॉलिवूडपटाची ऑफर दिली होती. यामध्ये शाहरुख खानदेखील झळकणार होता. प्रभास शाहरुख खानसोबत स्क्रिन शेअर करणार होता. पण, त्यानं ती ऑफर नाकारली.

प्रभासनं काय दिलं कारण?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलिकडेच त्यानं दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदच्या एका मोठ्या चित्रपटाची ऑफर नाकारली. या चित्रपटात शाहरुख खानसोबत प्रभास दिसणार होता, पण प्रभासनं स्पष्ट नकार कळवला. बाहुबली आणि सालार सारख्या हिट चित्रपटांमुळे घराघरांत पोहोचलेल्या प्रभासला सिद्धार्थ आनंदच्या नव्या चित्रपटात मोठ्या भूमिकेची ऑफर आली होती, ज्यामध्ये त्याला शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करायची होती. पण तो म्हणाला की, त्याला मल्टीस्टाररपेक्षा लीड रोल असलेले चित्रपट करायला आवडतात. 

जर मागे जाऊन पाहिलं, तर प्रभासनं आजवर केलेले चित्रपटही मल्टिस्टारर नाहीत. तो नेहमीच लीड रोलमध्ये दिसला आहे. त्याच्या बऱ्याच चित्रपटांती पटकथा त्याच्या भोवतीच फिरते. दरम्यान, प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या सोलो फिल्म्समध्ये खूप बिझी आहे. सध्या तो दिग्दर्शक मारुतीचा चित्रपट राजा साब आणि हनु राघवपुडी दिग्दर्शित फौजी या चित्रपटात काम करत आहे. तो संदीप रेड्डी वंगा यांचा चित्रपट स्पिरिट आणि नाग अश्विनच्या कल्की 2 मध्ये देखील झळकणार आहे. प्रभासचे सर्वच चित्रपट बिग बजेट असतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

नेटफ्लिक्सवरची 'दो पत्ती' जुनीच? काजोल, क्रिती सेनॉनचा चित्रपट 19 वर्षांपूर्वी आलेल्या 'या' फ्लॉप चित्रपटाची कॉपी?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget