South Indian Film: हातात श्रीरामाची मूर्ती, 'कांतारा'फेम कलाकाराच्या नव्या लुकची एकच चर्चा, त्रेतायुगापासून कलीयुगापर्यंत प्रवास उलगणार 'जय हनुमान'
जय हनुमान या ऋषभच्या आगामी सिनेमाची सध्या मनोरंजनसृष्टीत चांगलीच चर्चा होतेय.
Jai Hanuman:कन्नड सिनेमाचा दमदार अभिनेता ऋषभ शेट्टी आपल्या कांतारातील भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर ठसला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता त्याच्या जय हनुमान या त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या चित्रपटाचा पहिला लुकही समोर आला आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर या सिनेमाची घोषणा करत या अभिनेत्यानं आपल्या चाहत्यांना सरप्राइज दिलं आहे. त्यानं इंस्टाग्रॅमवर आपल्या या नव्या सिनेमाचा लुकही टाकलाय. यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रीया त्याला मिळत आहेत.
वचनपालनं धर्मस्य मूलम असं या फोटोखाली ऋषभ शेट्टीनं म्हटलंय. त्रेतायुगातून कलियुगापर्यंत अशी या सिनेमाची गोष्ट राहणार आहे.
हनुमानाच्या लुकमध्ये सिनेमाची घोषणा
जय हनुमान या ऋषभच्या आगामी सिनेमाची सध्या मनोरंजनसृष्टीत चांगलीच चर्चा होतेय. कांतारा चित्रपटात प्रेक्षकांची दाद मिळवणारी ऋषभ शेट्टी या सिनेमात हनुमानाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यानं त्याच्या चित्रपटाची घोषणा करत हनुमानाच्या भूमिकेचा लुक पोस्ट केला आहे. या लुकमध्ये तो श्रीरामाची पाषाण मूर्ती हातात घेतलेला दिसतोय.
View this post on Instagram
मनोरंजनसृष्टीतील कलाकारांच्याही उत्सुकता ताणल्या
या सिनेमाच्या घोषणेनंतर आणि जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लुकनंतर मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही त्याच्या लुकचं कौतूक केलंय, प्रसन्न वर्मा हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. दरम्यान अनेकांनी या पोस्टखाली जय हनुमान, जय श्रीराम अशा कमेंट्स केल्या आहेत.
राष्ट्रीय पुरस्कारही पटकावलाय ऋषभनं
ऋषभ शेट्टीचे खरे नाव प्रशांत शेट्टी असं आहे. पण चित्रपटात आल्यानंतर त्याने आपले नाव बदलून ऋषभ असे ठेवले आणि चाहतेही त्याला याच नावाने ओळखतात. अभिनेता असण्यासोबत तो दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखकही आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतही ते एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांना त्यांच्या चित्रपटांसाठी तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.