कार्तिक आर्यन नाही, तर 4 वर्षांपूर्वी जग सोडून गेलेल्या 'या' अभिनेत्याला होती 'भूल भुलैया 2'साठी निर्मात्यांची पहिली पसंती
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यन आता भूल भुलैया फ्रँचायझीचा अविभाज्य भाग बनला आहे. भूल भुलैया 2 च्या यशानं त्याला मोठा स्टार बनवलं. पण या चित्रपटासाठी कार्तिक हा निर्मात्यांची पहिली पसंती कधीच नव्हता, याबाबत तुम्हाला माहितीय का?
Kartik Aaryan, Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa 3) हा चित्रपट 2007 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत होता. पण जेव्हा निर्मात्यांनी या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच, पार्ट 2 बनवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मात्र, अक्षय कुमारच्या जागी कार्तिक आर्यनला (Kartik Aaryan) साईन करण्यात आलं. पण तुम्हाला माहितीय का? भूल भुलैयासाठी निर्मात्यांची पहिली पसंती कार्तिक आर्यनला कधीच नव्हतीच. सध्या हयात नसलेल्या एका अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारलं होतं, पण त्यानं नकार दिल्यामुळे कार्तिकची निवड करण्यात आली.
'भूल भुलैया'चा पहिला भाग प्रियदर्शननं दिग्दर्शित केला होता. पण, आता दुसरा पार्ट अनीस बज्मीनं दिग्दर्शित केला आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्यावेळी निर्मात्यांनी दुसऱ्या पार्टमध्ये अक्षय कुमारऐवजी कार्तिक आर्यनला घेण्याचा विचार केला, त्यावेळी मात्र सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ झाला, नेटकऱ्यांनी वारंवार निर्मात्यांकडे दुसऱ्या पार्टमध्येही अक्षय कुमारलाच ठेवावं, अशी मागणी केली. पण, निर्मात्यांनी अक्षय कुमारऐवजी कार्तिकला संधी दिली.
आता कार्तिक आर्यन 'भूल भुलैया' फ्रँचायझीचा अविभाज्य भाग बनला आहे. तो भूल भुलैया 3 मध्येही दिसणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, 'भूल भुलैया 2'साठी कार्तिक आर्यन निर्मात्यांची पहिली पसंती कधीच नव्हता. तर, त्याच्याऐवजी निर्मात्यांना सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) कास्ट करायचं होतं. पण, सुशांतनं स्पष्ट नकार दिला, त्यामुळेच कार्तिकला साईन करण्यात आलं.
भूल भुलैया 2 कधी आला?
IMDB वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, जेव्हा निर्मात्यांनी सुशांतला भूल भुलैया 2 मध्ये लीड रोलची ऑफर दिली, तेव्हा त्यानं ती भूमिका करण्यास नकार दिला. सुशांतनं नकार का दिला? याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही.
'भूल भुलैया 2' 20 मे 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच सुशांत सिंह राजपूतनं या जगाचा निरोप घेतला होता. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
लॉकडाऊनमुळे रखडलेला चित्रपट
निर्माता भूषण कुमार यांनी कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन सुरू होण्याच्या खूप आधी 'भूल भुलैया 2' साठी प्लानिंग सुरू केलं होतं. पण शूटिंग सुरू होताच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. अशा परिस्थितीत या चित्रपटाचं शुटिंग अनेकदा रखडलं. निर्मात्यांनी सुरुवातीला हा चित्रपट जुलै 2020 मध्ये प्रदर्शित करण्याची योजना आखली होती, परंतु कोरोनामुळे चित्रपट खूप उशिरा प्रदर्शित झाला.