एक्स्प्लोर

Telly Masala : CAA अध्यादेशावरून बॉलिवूडमध्ये रणकंदन ते किरण मानेंचा भाजपवर बोचरा वार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

CAA अध्यादेशावरून बॉलिवूडमध्ये रणकंदन! कोणी समर्थनात तर कोणी विरोधात

Bollywood Reactions on CAA : केंद्र सरकारकडून 11 मार्च 2024 रोजी भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. बॉलिवूडकरांनीदेखील (Bollywood Actor) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत मांडलं आहे. यात कंगना रनौत (Kangana Ranaut), थलापती विजय (Thalapathy Vijay), अनुराग कश्यप (Anurag Kashyap), स्वरा भास्कर (Swara Bhaskar), जावेद जाफरी (Jaaved Jaaferi) या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Struggle Story : रेड लाईट एरियात गेलं बालपण, भीक मागून काढले दिवस; दिलीप कुमारांनी दिली सिनेमाची ऑफर अन् झाले बॉलिवूडचे सुपरस्टार; जाणून घ्या कादर खान यांची स्ट्रगल स्टोरी

Kader Khan : बॉलिवूडच्या दमदार अभिनेत्याच्या यादीत कादर खान (Kader Khan) यांचा समावेश आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 200 पेक्षा अधिक सिनेमांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. विनोदी पात्रांसह खलनायकाची भूमिका देखील त्यांनी उत्तम वठवली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kiran Mane Social Media Post :  'सतरा लुगडी तरीबी म्या...'; अभिनेता किरण मानेंचा भाजपवर बोचरा वार

Kiran Mane Social Media Post : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. तर, दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंगदेखील सुरू झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय मुद्देदेखील चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याच दरम्यान आता, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी भाजप कार्यकर्त्यांवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचं कुंकू-राष्ट्रवादीचं मंगळसूत्र-काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था "सतरा नवरे... एकीला न आवरे !" अशी झाली असल्याचे टीका किरण माने यांनी केली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Bollywood Upcoming Movie with Political Context :  बॉक्स ऑफिस वाढवणार इलेक्शन फिव्हर; सत्ताधाऱ्यांना अनुकूल चित्रपटांची निवडणुकीत लाट

Bollywood Upcoming Movie with Political Context :  सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) वारे वाहू लागले आहेत. यंदाच्या निवडणुकीत सत्ता कायम ठेवण्याचा चंग सत्ताधारी भाजप-एनडीएने (BJP NDA) केला आहे. तर, दुसरीकडे भाजपला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्धार विरोधक इंडिया आघाडीने केला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून टीकेला धार आली आहे. अशातच दुसरीकडे  बॉक्स ऑफिसवरही राजकीय वातावरण तापणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री म्हणते, राजकारणात संधी मिळाली तर शेतीचं धोरण सर्वात आधी बदलेन!

Ashwini Mahangade : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अश्विनी राजकारणात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. याबद्दल अश्विनी म्हणते,"मुळात मी मतदार आहे. मतदार हा राजकारणातील महत्त्वाचा घटक असतो".

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राष्ट्रवादीचं अधिवेशन, अजित पवारांचं मोठं वक्तव्य... म्हणाले...Praful Patel Shirdi :  धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोललेNana Patole PC : 'मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाही,  गावात सरपंच सुरक्षित नाही' : नाना पटोलेSaif Ali Khan Suspect CCTV : सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV, दादरमधील दुकानात घेतले इअरफोन...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Embed widget