Radhe Shyam : 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी प्रभास चाहत्यांना देणार खास भेट, 'राधेश्याम'चे नवीन पोस्टर शेअर करत दिली माहिती
Prabhas : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासने 'राधेश्याम' सिनेमा संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
![Radhe Shyam : 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी प्रभास चाहत्यांना देणार खास भेट, 'राधेश्याम'चे नवीन पोस्टर शेअर करत दिली माहिती Radhe Shyam Prabhas to give special gift to fans on Valentine Day sharing new poster of Radheshyam Radhe Shyam : 'व्हॅलेंटाइन डे'च्या दिवशी प्रभास चाहत्यांना देणार खास भेट, 'राधेश्याम'चे नवीन पोस्टर शेअर करत दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/13/3b7e9e48022c4ef13712c3ac132f6459_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Radhe Shyam : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) बॉलिवूडमधील टॉप कलाकारांपैकी एक आहे. 'बाहुबली' सिनेमाने त्याला बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवून दिली आहे. सध्या तो 'राधेश्याम' (Radhe Shyam) सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच प्रभासने 'राधेश्याम' सिनेमा संबंधित एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.
प्रभासने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर 'राधेश्याम' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"व्हॅलेंटाइन डे'ला तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येत आहे". हे पोस्टर वेगवेगळ्या भाषांमध्ये शेअर करण्यात आले आहे. 'राधेश्याम' सिनेमा जानेवारीच्या सुरुवातील प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास 'राधे श्याम' चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. प्रभाससोबत पूजा हेडगेदेखील (Pooja Hegde) मुख्य भूमिकेत आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रभासचे चाहते राधेश्याम सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या
Rakhi Sawant : ड्रामा क्वीन राखी सावंत 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला पती रितेशपासून विभक्त, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती
83 on OTT : '83' चा नवा विक्रम, नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर एकाच दिवशी होणार प्रदर्शित
Jhund Song Teaser : बहुप्रतिक्षीत 'झुंड' सिनेमातील गाण्याचा टीझर आऊट, व्हॅलेंटाईन डेला गाणं होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)