VIDEO : नाना पाटेकरांच्या छोट्याशा कृतीने जिंकली सर्वांची मनं, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव; नेमकं काय घडलं?
Vanvas Movie : नाना पाटेकर वनवास या चित्रपटाच्या टीमसोबत प्रमोशन करताना दिसले. यावेळी त्यांच्या छोट्याश्या कृतीने सर्वांची मनं जिंकली.
Nana Pateker Viral Video : अभिनेते नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनयाची छाप पाडली आहे. अभिनेते नाना पाटेकर यांच्या आगामी वनवास चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वनवास चित्रपटाचं पोस्टर समोर आल्यापासून या चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहोचली होती आणि आता या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या टीमसह नाना पाटेकर प्रमोशन करताना दिसले. यावेळी त्यांनी ज्युनिअर कलाकारांसाठी नानांनी केलेल्या छोट्याशा कृतीमुळे त्यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.
नाना पाटेकरांच्या छोट्याश्या कृतीने जिंकली सर्वांची मनं
अभिनेते नाना पाटेकर वनवास चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जादू दाखवण्यास सज्ज झाले आहेत. वनवासच्या प्रमोशनच्या निमित्ताने नाना पाटेकर चित्रपटाच्या टीमसोबत मजा-मस्ती करताना दिसले. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरह व्हायरल होत आहे. नानाच्या छोट्याश्या कृतीने चाहत्यांची मनं जिंकली असून त्यांची कौतुक होत आहे. चाहते त्यांची वाहवा करताना थकत नाहीयत.
नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये नाना त्यांच्या आगामीच वनवास चित्रपटाच्या टीमसोबत प्रमोशन करत असल्याचं दिसतंय. यामध्ये नाना पाटेकर अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिम्रत कौर या नवोदित कलाकारांसोबत दिसत आहेत. यावेळी नाना टीमसोबत फोटोशूट करताना पाहायला मिळत आहेत. टीमसोबत फोटोशूट झाल्यानंतर नानांनी नवख्या कलाकारांसाठी जे केलं ते पाहून सगळेच चकित झाले. टीमसोबत फोटोशूट झाल्यानंतर नाना मीडियाला सांगतात की, एक काम करत या दोन मुलांचा फोटो घ्या. असं सांगत नाना स्वत: फ्रेममधून बाजूला होतात आणि त्या दोघांना एकत्र मीडियासमोर फोटो काढण्यासाठी उभं करतात.
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
यावेळी अभिनेता उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिम्रत कौर नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण नाना स्वत:मीडियाच्या कॅमेऱ्यासमोरून बाजूला होतात आणि त्या दोघांना फोटो काढायला सांगतात. यानंतर दोन्ही कलाकार फोटो काढतात. नवोदित कलाकारांसाठी नानांनी केलेल्या या छोट्याश्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. या व्हिडीओमधून नाना पाटेकर यांचा सरळ साधा स्वभाव आणि डाउन टू अर्थ स्वभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे.
पाहा व्हिडीओ
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :