Kiran Mane : "उभा महाराष्ट्र सांगतोय रं, कुणाची हाय शिवसेना"; किरण मानेंनी कवितेतून मांडला हुंकार
Kiran Mane Song : किरण माने यांनी नुकतच एका कार्यक्रमात "एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना", हे गाणं गायलं आहे. त्यांचा गाणं गातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kiran Mane : अभिनेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते किरण माने (Kiran Mane) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकतचं शिवसेनेच्या एका कार्यक्रमात त्यांनी "एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना", हे गाणं (Kiran Mane Song) गायलं आहे. त्यांचा गाणं गातानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
किरण माने नुकतेच सिंदखेडराजा येथे 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहिमेच्या उद्धाटनासाठी गेले होते. त्यावेळी तिथे त्यांनी एक भन्नाट गाणं गायलं. या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना... परवा सिंदखेडराजा इथे शिवसेनेच्या 'लेक महाराष्ट्राची साद मातोश्रीची' या मोहीमेचा उद्घाटक म्हणून मी गेलो होतो. माझ्या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानची एक आठवण सांगताना माझा मित्र विनायक पवार याचं हे भन्नाट गाणं मी ऐकवलं".
किरण मानेंनी ऐकवलेल्या गाण्याचे बोल काय आहेत? (Kiran Mane Song)
एकाच ताटात जेवून खाऊन भावाला लावलाय चुना
आरं येडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
आरं खुळ पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
कसा खोटा जमाना आला रं
झालं इमान भाजीपाला रं
वाघ जाळ्यात अडकून गेला रं
आन् ऐटीत फिरतोय कोल्हा रं
आरं हरीश्चंद्राचं सोंग घेऊनी आला शकुनीमामा
शेंबडं पोरगंबी सांगतंय राव कुणाची हाय शिवसेना
आहे माझ्या देशाची शान रं, माझं पवित्र संविधान रं
दोन गुजरात्यांच्या हाती रं आज सारंच पडलंय गहान रं
अगर तुमच्या उरावर हुकूमशाही, माना अगर न मारा
उभा महाराष्ट्र सांगतोय रं, कुनाची हाय शिवसेना
View this post on Instagram
किरण मानेंच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव (Kiran Mane Post Viral)
किरण माने यांची गाणं म्हणतानाची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर दादा तुमच्यावर कोणी किती टीका करू दे, उद्धव ठाकरेंच्या पडत्या काळात तुम्ही उभे राहिले, अशा शिलेदारांची आज गरज आहे शिवसेनेला, अगदी खरं, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. त्यांची ही कविता नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.
संबंधित बातम्या
Kiran Mane : "शिकले-सवरलेले लोक 'अशा' भामट्यांची अंधभक्ती करतात"; किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
