Kangana Ranaut : कंगनाच्या दणदणीत विजयानंतरही चाहते नाराज; बॉलिवूडला रामराम करणार असल्याच्या चर्चांना उधाण
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतची हिमाचल प्रदेशातील मंडीतून (Himachal Pradesh Mandi) संसदेत ग्रँड एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता कंगना बॉलिवूडला रामराम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Rnaut) हिमाचल प्रदेशातील मंडीतून (Himachal Pradesh Mandi) विजयी झाली आहे. बॉलिवूड गाजवल्यानंतर आता दिल्ली गाजवायला कंगना सज्ज झाली आहे. कंगनाची मंडीतून संसदेत ग्रँड एन्ट्री झाल्याने सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण तिचे काही चाहते मात्र नाराज झाले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कंगनाने घोषणा केली होती,"निवडणूक जिंकले तर बॉलिवूड सोडून देईन". त्यामुळे आता 'पंगाक्वीन' मंडीकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण करत राजकारणातच स्वत:ला झोकून देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं आहे. त्यामुळे आता ती बॉलिवूडचं मैदान सोडणार का? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.
कंगना रनौतला बॉलिवूडची 'पंगाक्वीन' असे म्हटले आहे. आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा तिच्यावर निशाणा साधला होता. आजवर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. पण गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेले तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात कमी पडले आहेत. आता तिच्या आगामी चित्रपटांचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
कंगना रनौतचा बॉलिवूडला रामराम? (Kangana Ranaut Quit Bollywood)
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आज तकला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौत म्हणाली होती,"चित्रपटांत काम करायचा कधीकधी मला कंटाळा येतो. पण राजकारणामुळे लोक माझ्यासोबत जोडली जात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मी कदाचीत फक्त राजकरणच करू शकते. एकावेळी मी एकच काम करू शकते. दोन्ही करता येणार नाहीत. मंडीतून निवडूण आल्यानंतर मी राजकारणच करेल. अनेकांना मला राजकारणात न जाण्याचा सल्ला दिला. पण मला लोकांसाठी काम करायला आवडतं. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर असेल".
विजयानंतर कंगना रनौतची पहिली प्रतिक्रिया? (Kangana Ranaut First Reaction After Winning Mandi Lok Sabha Seat)
कंगना रनौतने काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंहचा पराभव केला आहे. कंगना रनौतला 5,37,022 मते मिळाली आहे. 74,755 मतांनी तिने विक्रमादित्य सिंहचा पराभव केला आहे. विजयानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने मंडीकरांचे आभार मानले आहेत. कंगनाने लिहिलं आहे,"मंडीतील माझ्या कुटुंबाचे खूप-खूप आभार.. मंडीकरांनी दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दलही आभार.. हा विजय तुम्हा सर्वांचा आहे...हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा आहे. भाजपाने (BJP) दाखवलेला हा विश्वास आहे. हा विजय सनातन विचारांचा आहे..हा विजय मंडीकरांच्या सन्मानाचा आहे".
View this post on Instagram
कंगनाला हवाय संसदरत्न पुरस्कार
बॉलिवूड सोडण्यासोबत कंगनाने आपली इच्छादेखील व्यक्त केली होती. कंगना म्हणाली होती,"राजकारणात एन्ट्री केल्यानंतर संसदरत्न पुरस्कार मिळवण्याची माझी इच्छा आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर मला खऱ्या अर्थाने खूप आनंद होईल".
संबंधित बातम्या