एक्स्प्लोर

Kangana Ranaut : 'निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडून देईन', कंगना रणौतची मोठी घोषणा; राजकारणातच स्वत:ला झोकून देणार

Kangana Ranaut : कंगना रणौत ही मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. पण जर ही निवडणूक मी जिंकले तर मी फक्त राजकारणच करणार असल्याचं कंगनाने म्हटलं आहे. 

Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपची (BJP) उमेदवार आहे. तिला भाजपने तिची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातूनच उमेदवारी दिली आहे. सध्या कंगना ही तिच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार करतेय. त्यामुळे ती ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय. पण याच दरम्यान कंगनाने देखील एक मोठी घोषणा केली आहे. कंगना निवडणूक जिंकली तर ती काय करणार असा प्रचार कंगनाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय. त्यावर आता कंगनाने सडेतोड उत्तर दिलंय. 

जर कंगना लोकसभेची निवडणूक जिंकली तर बॉलीवूड सोडणार असल्याची घोषणाही तिने केली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे जर कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं तर ती बॉलीवूडचं मैदान सोडणार असल्याचं तिने सांगितलं आहे. 

कंगना बॉलीवूड सोडणार?

यावेळी कंगनाला सिनेमा आणि राजकारण हे दोन्ही एकाच वेळी कसं मॅनेज करते यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने म्हटलं की, मी सिनेमांमध्ये कंटाळून जाते, मी भूमिका करते, दिग्दर्शनही करते. पण जर मला राजकारणामध्ये माझ्याशी लोकं जोडली जात आहेत, असं दिसलं तर मग मी फक्त राजकारणच करेन. कारण मला एका वेळी एकच काम करायचं आहे. 

पुढे ती म्हणाली की, जर मला वाटलं की लोकांना माझी गरज आहे, तर मी त्याच दिशेला जाईन. जर मी मंडीतून निवडून आले तर मी राजकारणच करेन. मला अनेक दिग्दर्शकांनी सांगितलं की, राजकारणात नको जाऊस. पण मला लोकांच्या विश्वासाला खरं उतरायचं आहे. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होऊ देणं हे योग्य नाही. त्यामुळे जर मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती देखील स्वीकारेन.  मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.

राजकारण आणि सिनेमांमध्ये काय फरक?

राजकारण आणि सिनेमांमध्ये काय फरक आहे? यावर बोलताना कंगना म्हणाली की, सिनेमाचं जग हे खोटं असतं, पण राजकारण हे वास्ताविक जग आहे. सिनेमांचं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी रंगवल्या जातात. पण राजकारणात तसं नसतं. इथे लोकांच्या विश्वासाला खरं उतरावं लागतं. मी या क्षेत्रात नवीन आहे, त्यामुळे मला इथून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. 


ही बातमी वाचा : 

Panchayat 4 Big Update: जिथे 'पंचायत-3' संपणार तिथूनच 'पंचायत-4' ची गोष्ट सुरु होणार? समोर आली मोठी अपडेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget