एक्स्प्लोर
'त्या' इंटिमेट सीन्समुळे गुरमीतची पत्नी नाराज?

नवी दिल्ली : अभिनेता गुरमीत चौधरीने आपली पत्नी ‘वजह तुम हो’ सिनेमातील इंटिमेट सीन्समुळे नाराज नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘वजह तुम हो’ सिनेमाच्या ट्रेलरमधील इंटिमेट सीन्सची सर्वत्र चर्चा होती. याचवेळी गुरमीतची पत्नीही नाराज झाली, अशा अफवा पसरवल्या जात होत्या.
पत्नी देबिना आणि गुरमीत यांच्यात श्रीलंकेत भांडण झालं, अशी चर्चा होती. मात्र या अफवांना पूर्ण विराम देत देबिना नाराज होण्याचं काहीही कारण नाही, असं गुरमीतने स्पष्ट केलं.
सना खानसोबतच्या इंटिमेट सीन्सबाबत पत्नीला अगोदरच माहिती दिलेली होती. शिवाय ती सिनेसृष्टीला ओळखते. त्यामुळे कलाकार म्हणून ते सीन्स गुरमीत नाही तर एक कलाकार करत आहे, याची समज देबिनाला आहे, असंही गुरमीतने सांगितलं.
विशाल पांडे दिग्दर्शित ‘वजह तुम हो’ सिनेमात शरमन जोशी आणि रजनीश दुग्गल यांची मुख्य भूमिका आहे. हा सिनेमा 2 डिसेंबरला रिलीज होणार आहे.
पाहा सिनेमाचा ट्रेलर :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
