एक्स्प्लोर

Junaid Khan debut film Maharaj : जुनैदच्या 'महाराज'च्या अडचणी वाढल्या, चित्रपटाच्या रिलीजला स्थगिती

Junaid Khan Debut Film Maharaj : जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या रिलीजला गुजरात हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

Junaid Khan Debut Film Maharaj :  आमिर खानचा (Aamir Khan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) याचं बॉलिवूड पदार्पण लांबले आहे. जुनैदचा पदार्पणातील चित्रपट 'महाराज'च्या (Maharaj) रिलीजला गुजरात हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. या चित्रपटात झुनैद महत्त्वाची भूमिका साकारत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कोर्टात या चित्रपटाविरोधात याचिका दाखल केली आहे. या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आक्षेप हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. अहमदाबाद आणि मुंबईत या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. अहमदाबादमध्ये वैष्णव पंथाच्या अनुयांनीदेखील याचिका दाखल केली आहे. 

ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर महाराज चित्रपट 14 जून रोजी रिलीज होणार होता. मात्र,  या चित्रपटाला आता 18 जूनपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. विहिप आणि निर्माते यशराजच्यावतीने कोर्टात बाजू मांडण्यात आली होती. कोर्टाने 18 जूनपर्यंत चित्रपटाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. पुश्ती मार्गी वैष्णव पंथाच्या अनुयांनी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाने चित्रपटाला 18 जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. कोर्टाने यशराज फिल्मस, ब्रॉडकास्टिंग प्राधिकरण, सेन्सॉर बोर्ड, नेटफ्लिक्सला नोटीस बजावली आहे. 

महाराज हा चित्रपट आधी  14 जूनला रिलीज होणार होता. पण आता 18 जूनपर्यंत स्थगिती दिल्याने चित्रपटासाठी प्रेक्षकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.  या प्रकरणी यशराज फिल्म्सकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

महाराज'ची कथा काय?

'महाराज' हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून त्यात जुनैदसोबत जयदीप अहलावतची भूमिका आहे. हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबेल केसवर आधारित आहे. हे प्रकरण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कायदेशीर लढाईपैकी एक समजले जाते. चित्रपटात जुनैदने पत्रकार आणि समाजसुधारक करसनदास मुलजीची भूमिका साकारली आहे. तर अहलावतने वल्लभाचार्य पंथाचे प्रमुख जदुनाथजी बृजरतनजी महाराज यांची भूमिका साकारली आहे.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Netflix India (@netflix_in)

'महाराज' मध्ये कोणते कलाकार?

'महाराज' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार नसून थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट कोणत्याही प्रमोशन किंवा टीझरशिवाय थेट OTT वर प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.  'महाराज' चित्रपटात जुनैद खान, जयदीप अहलावत यांच्यासह विपुल मेहता, शालिनी पांडे, शर्वरी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी 'यशराज फिल्मस एंटरटेन्मेंट'च्या बॅनर अंतर्गत केली आहे. 
 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika Padukone Concern Over Mumbai Air Quality: 'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
'शहरातली लहान मुलं गुदमरतायत...'; मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणानं दीपिका पादुकोणची धडधड वाढली, BMC ला आवाहन करत म्हणाली...
Neena Gupta On Unexpected Pregnancy Rumours: 66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
66 वर्षांच्या नीना गुप्ता गरोदर? विजय-रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये फ्लॉन्ट केला बेबी बंप, VIDEO
Prakash Raj On LPG Crisis: 'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
'पाहुयात, भक्त कसे व्यक्त होतायत...', LPG तुटवड्यावर पोस्ट करुन दिग्गज अभिनेत्याचा खोचक टोला
Priyanka Chopra On Bollywood: 'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट
'मला घाणीत राहायला आवडत नाही...', बॉलिवूड सोडून हॉलिवूडमध्ये गेलेल्या प्रियांका चोप्राचा नवा खुलासा, इंडस्ट्रीच्या 'डर्टी पॉलिटिक्स'वरही ठेवलं बोट

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Paper Leak Case : दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, नर्सिंगचा विद्यार्थी 600 रुपये उकळायचा, पोलीस तपासात सत्य समोर
दहावीच्या पेपरफुटी प्रकरणाला नवं वळण, पेपर फुटलाच नाही, पोलीस तपासात वेगळाच अँगल समोर
US Iran War : अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं 6 वर्षातील सर्वात मोठं नुकसान
अमेरिका- इराण युद्ध सुरु झाल्यापासून शेअर बाजारात 33 लाख कोटी बुडाले, गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान
Hormuz Strait  Crisis: भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
भारतासाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत, भारत जुना मित्र असल्याचा इराणचा दावा
Ratnagiri Crime : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार; कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या दोघांना अटक
Home Loan: स्वत:चं घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा? जाणून घ्या यादी
Home Loan: स्वत:चं घर खरेदीचं स्वप्न पाहताय, गृहकर्जाचा सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?  
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
इकडं कुवेतनंतर इराकमध्ये हवेत इंधन भरणारं अमेरिकन हवाई दलाचं विमान कोसळलं; चार क्रू मेंबर्सचा मृत्यू, 2 बेपत्ता; तिकडं ट्रम्पकडून इराण सुप्रीम लीडरांविरोधात भलताच दावा
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरमधील घसरण कायम, गुंतवणूकदारांना फटका, बाजारमूल्य 10 लाख कोटींच्या आत, LIC चेही नुकसान
SBI च्या शेअरमधील घसरण थांबेना, बाजारमूल्य घटलं, एका दिवसात 30 हजार कोटींचा फटका, LIC चेही नुकसान
India US Trade Deal : ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार? नेमकं काय घडलं? 
ट्रम्प यांच्या एका घोषणेनं भारत- अमेरिका व्यापार करारात खोडा? ट्रेड डीलची प्रक्रिया लांबणीवर पडणार?
Embed widget