Bollywood Actor : बॉलिवूडचा 'न्यायाधीश' ज्याने 300 चित्रपटात साकारली एकसारखी भूमिका, कधीच मिळाला नाही लीड रोल...
Bollywood Actor Murad : बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता होता ज्याने 300 चित्रपट केले आणि सर्व चित्रपटांमध्ये एकसारखीच भूमिका साकारली. या अभिनेत्याचे अनेक चित्रपट हिट ठरले पण त्याला कधीही आणि एकाही चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही.
Bollywood Actor Murad : हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना वेगवेगळ्या भूमिका साकारण्यास आवडते. पण बॉलिवूडमध्ये एक असा अभिनेता होता ज्याने 300 चित्रपट केले आणि सर्व चित्रपटांमध्ये एकसारखीच भूमिका साकारली. या अभिनेत्याचे अनेक चित्रपट हिट ठरले पण त्याला कधीही आणि एकाही चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली नाही. या अभिनेत्याचा मुलाने बॉलिवूडमध्ये भारदस्त आवाज, दमदार अभिनयाने खलनायक म्हणून छाप सोडली.
300 चित्रपटांमध्ये एकच भूमिका साकारणारा अभिनेता
300 चित्रपटांमध्ये जवळपास एकच भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे हमीद अली मुराद. मुराद यांचा जन्म 1911 मध्ये रामपूरमध्ये झाला. 1940 च्या दशकात जेव्हा त्यांनी चित्रपटांमध्ये कारकीर्द सुरू केली तेव्हा त्यांना फक्त मुराद या नावाने ओळखले जात असे. 1943 ते 1990 पर्यंतच्या त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत, मुराद यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. कायदेशीर अधिकाऱ्यांची, विशेषत: न्यायाधीशाची भूमिका बजावण्यासाठी त्यांची ओळख होती. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी एकसारखी भूमिका साकारली होती.
View this post on Instagram
लीड रोलपासून राहिले वंचित....
मुरादन यांनी चित्रपटांमध्ये पोलीस आयुक्त किंवा महाराज,सम्राट यासारख्या भूमिकाही केल्या. 'अंदाज', 'आन', 'देवदास', 'मुगल-ए-आझम', 'यादों की बारात', 'मजबूर', 'कालिया' आणि 'शहेनशाह' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये मुराद यांनी काम केले. मुराद यांना त्यांच्या सर्व चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिका मिळाल्याबद्दल नेहमीच खेद वाटत राहिला. ते कधीही लीड रोलमध्ये दिसला नाही. 1990 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'प्यार के नाम कुर्बान'मध्ये त्यांनी साकारलेली भूमिका ही शेवटची ठरली.
लेखक व्हायचे होते पण झाले अभिनेते...
मुराद यांचा जन्म रामपूर येथे झाला. त्या काळी ब्रिटिश राज्यकर्ते होते. त्यावेळी रामपूर हा नवाबाच्या अखत्यारीत होते. मुराद यांनी नवाब विरोधात काढलेल्या मिरवणुकीत भाग घेतला होता. यामुळे त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यानंतर सगळ्या कुटुंबाने 24 तासांत रामपूर सोडले आणि नंतर मुंबई गाठली.
मुराद यांना लेखक व्हायचे होते. त्यांनी मेहबूब खान यांची भेट घेतली. मेहबूब खान यांना त्यांनी एक स्क्रिप्ट ऐकवली.
ज्यामुळे त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाला जीवाला धोका होता. हे कुटुंब 24 तासांतच रामपूरहून पळून गेले आणि मुंबईत पोहोचले. मुरादला लेखक व्हायचे होते, पण मेहबूब यांनी त्याला अभिनेता बनण्याची विनंती केली आणि अशा प्रकारे मुराद हे अभिनेते झाले. मुराद यांनी 1997 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
मुराद यांचा मुलगा रझा मुराद हे स्वत: एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. रझा मुराद यांनी गेल्या 40 वर्षांत शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रझा मुराद यांनी आपल्या भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.