एक्स्प्लोर

Bhumi Pednekar : भूमीनं हे घातलंय काय? 'नागिण' स्टाईल अतरंगी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी काढली उर्फीची आठवण, सोशल मीडियावर ट्रोल

Bhumi Pednekar Look in GQ Awards : अलिकडेच एका अवॉर्ड शोमध्ये भूमी पेडणेकर स्टायलिश लूकमध्ये दिसली. पण, तिचा हा लूक व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Bhumi Pednekar Trolled for Fashion : बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशन सेन्समुळेही चर्चेत असते. भूमी पेडणेकरचे स्टायलिश लूक अनेकदा लक्ष वेधून घेतात. आता पु्न्हा एकदा भूमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे. अलिकडेच एका अवॉर्ड शोमध्ये भूमी पेडणेकर स्टायलिश लूकमध्ये दिसली. पण, तिचा हा लूक व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

'नागिण' भूमी पेडणेकरची अतरंगी फॅशन

अभिनेत्री भूमी पेडणेकरने GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्ड्समध्ये हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्यात भूमीने एथनिक ड्रेसला फॅशनचा स्पेशल टच देत खास लूक कॅरी केला होता. पण, तिचा हा अतरंगी लूक पाहून नेटकऱ्यांना मोठा धक्काच बसला. सोशल मीडियावर लोकांनी करत तिला ट्रोल करायला सुरुवात केली. GQ बेस्ट ड्रेस्ड अवॉर्ड्समध्ये भूमी पेडणेकरने साप गुंडाळलेला अतरंगी ड्रेस घातला होता. मग काय नेटकऱ्यांनी यावरुन तिला खूप ट्रोल करायला सुरुवात केली.

भूमी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल

अभिनेत्री भूमी पेडणेकर अवॉर्ड शोमध्ये भूमी पेडणेकरही अशा अतरंगी अवतारात दिसली. त्यानंतर यूजर्सनी तिच्यावर जोरदार टीका केली. नेटकरी तिला खूप वाईट पद्धतीने ट्रोल करत आहेत. रेड कार्पेटवर व्हाईट कलरची आर्मर साडी घातली होती, ज्यामध्ये छातीवरील बाजूला दोन साप होते. यासोबतच तिने हातात काचेच्या मोठ्या बांगड्या घातल्या होत्या. 

भूमीची फॅशन पाहून नेटकऱ्यांना आली उर्फीची आठवण

भूमीने इंस्टाग्रामवर कॅप्शनसह तिच्या या कस्टम स्नेक ब्रेस्टप्लेट साडीतील लूकचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, सिंड्रेला तिच्या आर्मरमध्ये तयार आहे #GQBestDressed2024. भूमीचा हा अतरंगी लूक नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला नाही. या लूकमधील तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना मोठा धक्का बसला आहे. आता लोक भूमी पेडणेकरची तुलना उर्फी जावेदशी करू लागले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

भूमी पेडणेकरच्या लूकवर नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिलं की, 'असं असेल तर उर्फी यापेक्षा चांगली आहे'. एकाने लिहिलंय म्हणाला, 'मला वाटतं उर्फीचा ड्रेसिंग सेन्स हिच्यापेक्षा चांगला आहे. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करताना दुसऱ्या यूजरने लिहिलंय,  'बुलेट प्रूफ नाग.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'हे भगवान हरी कृष्ण जगन्नाथम् प्रेमानंद, तू काय घातलं आहेस?' एकजण म्हणाला, 'हा काय मूर्खपणा आहे?' दुसऱ्याने लिहिलंय,'फॅशनच्या नावावर काहीही... का पण का, गरज काय होती?'

महत्त्वाच्या इतर बातम्या :

MC Stan Missing Poster : ‘बिग बॉस’ फेम रॅपर एमसी स्टॅन बेपत्ता, सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena Protest : मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात शिवसेनेकडून विधानसभेत निषेधAjit Pawar On Oppositon : लक्षात घ्या तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय, किती दिवस रडीचा डाव खेळणार?Rahul Narvekar On opposition : संख्याबळ कमी असेल तरीही आवाज कमी राहणार नाही, नार्वेकरांचं विरोधकांना आश्वासनABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 09 December 2024 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
राज्यसभा सभापतींना हटवण्यासाठी विरोधक अविश्वास प्रस्ताव आणणार, 70 खासदारांचा पाठिंबा
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
डीएसपी मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडशी वाद भोवला; आक्रमक हातवारे केल्यानं आयसीसीकडून मोठी शिक्षा
Team India WTC Points Table : ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
ऑस्ट्रेलिया आणि कायम कमनशिबी ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेनं सुद्धा टीम इंडियाच्या पायात साप सोडला! एक पराभव अन् रोहित सेना दुहेरी संकटात
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
Amol Mitkari : Jayant Patil यांच्यासाठी हीच योग्य वेळ राम कृष्ण हरी,चला जाऊ देवगीरी!
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
मोठी बातमी : मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात खुद्द CM फडणवीस घालणार लक्ष, 11 डिसेंबरला 'त्या'14 तरुणांची घेणार भेट
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
शिवनेरीच्या भूमिला मंत्रीमंडळात स्थान द्या, अपक्ष आमदाराचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
Nashik Crime : माझ्या बड्या राजकीय नेत्यांशी ओळखी, 15 कोटी द्या, थेट राज्यपाल करतो, नाशिकमधील 12 वी पास भामट्यानं घातला शास्त्रज्ञाला गंडा!
नाशिकमधील भामट्याचा शास्त्रज्ञावर राजकीय प्रयोग; राज्यपाल करतो म्हणत घातला गंडा
MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले
Embed widget