शिल्पा शेट्टीच्या पतीचं बांगलादेशी ॲडल्ट फिल्म स्टारसोबत कनेक्शन? राज कुंद्रा म्हणाला...
Raj Kundra On Linkup With Bangladeshi Porn Star : अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रावर बांगलादेशी ॲडल्ट फिल्म स्टार बन्ना शेखसोबत संबंध असल्याचा आरोप होत आहे.
![शिल्पा शेट्टीच्या पतीचं बांगलादेशी ॲडल्ट फिल्म स्टारसोबत कनेक्शन? राज कुंद्रा म्हणाला... bangladeshi adult film star riya barde aka banna shaikh Connection with raj kundra denies reports marathi news शिल्पा शेट्टीच्या पतीचं बांगलादेशी ॲडल्ट फिल्म स्टारसोबत कनेक्शन? राज कुंद्रा म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/29/84e1f3521e093132341ab72532a6ceaa1727578576833322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bangladeshi Illegal Immigrants : बेकायदेशीरपणे भारतात राहिल्यामुळे बांगलादेशी अडल्ट स्टार रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता तिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव घेतलं आहे. भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याप्रकरणी बन्ना शेखला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील उल्हासनगर येथून अटक करण्यात आली आहे. रिया बर्डेचे खरं नाव बन्ना शेख आहे. पॉर्न स्टार बन्ना शेख भारतात अवैधरित्या राहत होती.
शिल्पा शेट्टीच्या पतीच्या अडचणी पुन्हा वाढणार?
रिया बर्डे ही बांगलादेशची प्रसिद्ध ॲडल्ट फिल्म स्टार आहे. ती बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने भारतात वास्तव्यास होती. आता तिने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्यासोबत काम केल्याचा दावा केला आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याच्या प्रोडक्शनमध्येही तिने काम केलं असल्याचं सांगितलं जात आहे. राज कुंद्रासोबतच्या त्याच्या कनेक्शनच्या बातम्या चर्चेत आहेत. दरम्यान, या आरोपांवर राज कुंद्राने स्वत: पुढे येत याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
अडल्ट स्टारच्या प्रकरणात जोडलं जातंय नाव
राज कुंद्राने या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, मी आता व्हायरल होत असलेल्या मीडिया रिपोर्ट्समुळे त्रस्त आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये माझ्यावर खोटो आरोप लावले जात आहे. "माझ्यावर आरोप होत आहे की, भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेली एक व्यक्ती माझ्यासाठी काम करत होती आणि या व्यक्तीचा माझ्याशी संबंध आहे. मली हे स्पष्ट करायचं आहे की, या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही आणि मी कोणत्याही प्रोडक्शन कंपनीचा मालक नाही आणि अशा कंपनीशी माझा संबंध नाही", असं राज कुंद्राने स्पष्ट केलंय. एचटी सिटीशी बोलताना राज कुंद्राने हे वक्तव्य केलं आहे.
View this post on Instagram
"मी खोटे आरोप खपवून घेणार नाही"
राज पुढे म्हणाला की, "हे बिनबुडाचे दावे केवळ माझी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हतेलाच हानी पोहोचवत असून मीडियाच्या आकर्षणासाठी माझ्या नावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मी नेहमीच माझा व्यवसाय पूर्ण प्रामाणिकपणे केला आहे आणि असे खोटे आरोप मी खपवून घेणार नाही".
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bigg Boss Marathi : अंकिता, डीपी आणि पॅडीला वाईट दाखवून काय मिळणारय? बिग बॉसवर प्रेक्षक भडकले
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)