Bigg Boss Marathi : अंकिता, डीपी आणि पॅडीला वाईट दाखवून काय मिळणारय? बिग बॉसवर प्रेक्षक भडकले
Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीच्य पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
Bigg Boss Marathi Season : बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा ग्रँड फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात कालच्या भागात खास पाहुणे आले आहेत. ज्यांनी घरातील सदस्यांची शाळा घेतली. यामध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील माजी स्पर्धक डॉ. अभिजीत बिचुकले याने बिग बॉसच्या घरातील इन्फ्लुएंसर्सला धारेवर धरलं. अंकिता आणि डीपी यांच्यासोबत पॅडी अत्यंत कपटी असून कुजकेपणाने वागत आहेत, असं अभिजीत बिचुकलेनं म्हटलं. यानंतर प्रेक्षकांचा संताप अनावर झाला आहे.
अंकिता, डीपी आणि पॅडीला वाईट दाखवून काय मिळणारय?
बिग बॉस मराठी आता जाणूनबुजून बी टीमला वाईट दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. ज्या इन्फ्लुएंसर्समुळे बिग बॉस मराठीला टीआरपी मिळाला आता शेवटच्या आठवड्यात त्याच बी टीमला बाजूला सारायचा प्रयत्न सुरु आहे. अंकिता वालावलकरला नेटकऱ्यांचा फुल्ल सपोर्ट मिळताना दिसत आहे. बिग बॉस आणि बिचुकले जेवढं अंकिताला निगेटिव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, तेवढी ती निगेटिव्ह नाहीय, ती आणि पॅडी पहिल्या दिवसापासून सूरजसोबत आहेत, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
बिग बॉसवर प्रेक्षक भडकले
बिग बॉस मराठीवर नेटकरी भडकल्याचं दिसत आहे. "अंकिताला तिच्या चांगुलपणा आणि खरेपणाची शिक्षा का मिळतेय, असंच वाटलं आज.","अंकिता आणि डी.पीला मुद्दाम साईड लाईन केले", "नॉमिनेशन टास्कवरून अंकिताच्या बहीण होण्याच्या भावनेवर प्रश्न उचलायला नको होता", "अंकिता तू या बिचुकले माकडाचं काय ऐकू नको", अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यांनी शोवर संताप व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहा
महत्त्वाच्या इतर बातम्या :