Bhonga : 'भोंगा' सिनेमागृहातून काढायला लावणं पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं? अमेय खोपकरांचा सवाल
Bhonga : 'भोंगा' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

Bhonga : 'भोंगा'(Bhonga) सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून सध्या हा सिनेमा चर्चेत आहे.राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'भोंगा' सिनेमा प्रदर्शनापूर्वीच चर्चेत आला होता. दरम्यान मनसे नेते आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी ट्वीट करत राज्य सरकारला सवाल केला आहे.
अमेय खोपकर यांनी म्हटले आहे, राज्य सरकार हुकूमशाहासारखं वागतयं. 'भोंगा' सिनेमा सिनेमागृहातून काढलया लावत आहेत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वत: गृहखातंच सांगतंय. जो सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो 'भोंगा' सिनेमा सिनेमागृहातून काढायला लावणं हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
राज्य सरकार हुकूमशहासारखं वागतंय. ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावतायत. पोलिसांना बेकायदेशीर कामं करायला स्वतः गृहखातंच सांगतंय.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
'भोंगा धार्मिक नाही तर सामाजिक समस्या आहे' असा आशयघन विषय असलेला भोंगा हा सिनेमा येत्या 3 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
जो चित्रपट राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित आहे, सेन्सॉर बोर्डाचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे, तो ‘भोंगा’ चित्रपट थिएटरमधून काढायला लावणं, हे पोलिसांच्या कोणत्या अधिकारात बसतं?
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) May 3, 2022
भोंगा सिनेमाचे कथानक काय?
'भोंगा' चित्रपटाची कथा ही अजाणावर भाष्य करणारी आहे. एका कुटुंबातील चिमुकल्या बाळाला Hypoxic Ischemic Encephalopathy हा दूर्धर आजार झालेला असतो. अजानच्या भोंग्यामुळे या बाळाच्या तब्येतीवर आणखीन परिणाम होत जातो. बाळाला होणारा त्रास संपूर्ण गाव तर पाहतच असतो, हा त्रास थांबवण्यासाठी नेमके कोणते प्रयत्न केले जातात.
संबंधित बातम्या
Sachin Kharat : राज्य सरकारने प्राजक्ता माळीवर कायदेशीर कारवाई करावी; सचिन खरातांची मागणी
Prajakta Mali : आज 3 तारीख... राज ठाकरेंसंबंधित प्राजक्ता माळीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Veer Daudale Saat : सरनोबत प्रतापराव गुजर अन् त्यांच्या सहा एकनिष्ठ हिऱ्यांची शौर्यगाथा; 'वीर दौडले सात'चं मोशन पोस्टर रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
