Entertainment News Live Updates 21 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
‘राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीत सुधारणा मात्र...’, अभिनेते शेखर सुमन यांनी दिली हेल्थ अपडेट
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत नवे अपडेट समोर आले आहे. अभिनेता शेखर सुमन यांनी ट्विट करून राजू श्रीवास्तव यांच्या आरोग्याची माहिती दिली आहे. यामध्ये ट्विटमध्ये शेखरने म्हटलेय की, राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे.
Today's update on Raju according to his family members..his organs are functioning normally.Though still unconscious,doctor says,he is supposedly improving steadily.Mahadev ki kripa.Har Har Mahadev🙏🙏🙏
— Shekhar Suman (@shekharsuman7) August 21, 2022
दोन हेल्मेटसह वाहतुकीचे नियम पाळत मुंबईच्या रस्त्यांवर विराट अन् अनुष्काने लुटली पावसाची मजा! पाहा व्हिडीओ...
View this post on Instagram
‘बिग बॉस 16’साठी सलमान खानने आकारली ‘इतकी’ फी! साऊथ चित्रपटापेक्षाही मोठं बजेट
Salman Khan, Bigg Boss : टीव्हीचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' लवकरच नव्या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोचा होस्ट सलमान खान या सीझनसाठी 15व्या सीझनपेक्षा तिप्पट जास्त फी आकारणार आहे. मात्र, निर्मात्यांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. ‘बिग बॉस’च्या नव्या सीझनची घोषणा होताच या शोशी संबंधित अनेक चर्चांचा फेरा सुरू झाला आहे.
सोशल मीडियावर ‘बॉयकॉट लायगर’ची मागणी, विजय देवरकोंडा ट्विट करत म्हणाला ‘आम्ही लढू...’
ट्विटरवर अचानक अभिनेता विजय देवरकोंडा याच्या 'लायगर' या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू झाली आहे. करण जोहरमुळे आधीच अनेकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकला होता, तर काही लोक विजय देवरकोंडा यांच्या वक्तव्यावर संतापले होते. विजय 'लाल सिंह चड्ढा' आणि आमिर खानच्या समर्थनार्थ बोलला होता. या सगळ्यादरम्यान विजय देवरकोंडा यांनी एक ट्विट केले आहे, जे आता खूप व्हायरल होत आहे.
विजय म्हणतो, आम्ही लढू!
बॉयकॉट ट्रेंड दरम्यान, विजय देवरकोंडा याने एक ट्विट केले आहे. त्याचे हे ट्विट बॉयकॉट ‘लायगर’ ट्रेंडशी जोडले जात आहे. तथापि, विजयने त्याच्या ट्विट बॉयकॉट ट्रेंडचा कुठेही उल्लेख केलेला नाही. पण आपण ही लढाई लढण्यास तयार असून इतरांची चिंता करत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
Manam Correct unnapudu
— Vijay Deverakonda (@TheDeverakonda) August 20, 2022
Mana Dharmam manam chesinapudu
Evvadi maata vinedhe ledu.
Kotladudham 🔥#Liger
अमृता खानविलकरचा दिलखेचक अंदाज!
View this post on Instagram
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
