Entertainment News Live Updates 14 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसच्या अडचणीत वाढ
Jacqueline Fernandez : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस (Jacqueline Fernandez) सध्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चर्चेत आहे. जॅकलीनला ईडीने (आज) 14 सप्टेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जॅकलीन आज न्यायालयात चौकशीसाठी हजर राहिली. एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ तास जॅकलीनची चौकशी सुरू होती.
Jacqueline Fernandez was questioned today. We questioned her about the gifts she took from Sukesh & other issues. Pinky Irani who introduced Jacqueline to Sukesh was also called. We'll call both Jacqueline & Pinky again & accordingly, we'll proceed: Ravindra Yadav, Spl CP, EoW pic.twitter.com/CCvfOW0vRk
— ANI (@ANI) September 14, 2022
Bhaubali : प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी 'भाऊबळी' सज्ज
Bhaubali : गेल्या काही दिवसांपासून अनेक दर्जेदार मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' (Bhaubali) हा एक धमाल विनोदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमात विनोदवीरांची फौज असल्याने हा सिनेमा प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करणार आहे.
Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'चं घर यंदा असेल का निर्बंधमुक्त?
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट झाल्यापासून प्रेक्षक या कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहेत. येत्या दोन ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना त्यांचा लाडका कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. पण आता बिग बॉसच्या घरात सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना आरटीपीसीआर टेस्ट करावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.
यवतमाळमध्ये खासदार राणा विरोधात सेवानिवृत्त पोलीस आक्रमक
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडक कारवाई करावी, तसेच गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी- कर्मचारी संघटना यवतमाळमध्ये आक्रमक झाली आहे.
Hariom : 'हरिओम' चा लक्षवेधी मोशन पोस्टर रिलीज
Hariom : महाराष्ट्राचे आराध्यदैवत, आदरस्थान श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे उमरठचे दोन वीर बंधू मावळे सिंह तान्हाजी आणि सूर्याजी यांच्या बंधूप्रेम व शिवप्रेमाला प्रेरित झालेल्या दोन भावंडांची कथा मांडणारा 'हरिओम' (Hariom) हा चित्रपट लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
