Bhaubali : टेन्शनला मारा गोळी... मनोरंजनचा विस्फोट करायला येतायत 'भाऊबळी'; नवं पोस्टर आऊट
Bhaubali : 'भाऊबळी' या आगामी सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.
Bhaubali : 'भाऊबळी' (Bhaubali) या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र 'भाऊबळी' सिनेमाची चर्चा रंगली आहे. नुकतेच या सिनेमाचं नवं पोस्टर आऊट झालं आहे. या पोस्टरमध्ये मनोज जोशी आणि किशोर कदम दिसून येत आहेत.
अफलातून हंगामा आणि नवा दृष्टिकोन घेऊन येत आहे 'भाऊबळी'
"टेन्शनला मारा गोळी...मनोरंजनाचा विस्फोट करायला येतायत आपले...'भाऊबळी", असं म्हणत 'भाऊबळी' सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये मनोज जोशी यांच्या विरोधी भूमिकेत किशोर कदम दिसत आहेत. त्यांच्यातल्या वैराची कमाल विनोदी कहाणी प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. या दोघांच्या युद्धाचे नेमके कारण सिनेमा पाहिल्यावरच कळेल. विनोदी तरी मोलाची शिकवण देऊन जाणारा हा सिनेमा असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.
View this post on Instagram
'भाऊबळी' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर सर्वत्र 'भाऊबळी'ची चर्चा रंगली आहे. मनोज जोशी, किशोर कदम, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, संतोष पवार, प्रियदर्शनी इंदलकर, आशय कुलकर्णी, रेशम टिपणीस आणि अनेक कमालीच्या विनोदवीरांसह प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन करायला 'भाऊबळी' सज्ज आहे.
16 सप्टेंबरला 'भाऊबळी' येणार प्रेक्षकांच्या भेटीली
'भाऊबळी'च्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून विनोदाने भरलेल्या या सिनेमाच्या ट्रेलरला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. प्रेक्षकांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत, समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा विनोदी सिनेमा येत्या 16 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत.
संबंधित बातम्या