एक्स्प्लोर

वेदा, स्त्री-2 की खेल खेल में, बॉक्स ऑफिसवर कोण ठरलं सरस? जाणून घ्या कोणी किती कमवले?

अक्षय कुमारचा 'खेल खेल में' तसेच जॉन अब्राहमचा 'वेदा' या चित्रपटांनी 'स्त्री 2' ला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतु 'वेदा' तसेच 'खेल खेल में' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मागे पडलेले दिसून येत आहेत.

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे 'वेदा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी चांगली कामगिरी करताना दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांत सिनेमागृहात मोठे बजेट असणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्या चित्रटांपैकी काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई करताना दिसत आहेत. मात्र काही चित्रपट चांगली कमाई करु शकले नाहीत. 

हिंदी सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट तगडी कमाई करतोय. बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' तसेच जॉन अब्राहमचा 'वेदा' या चित्रपटांनी 'स्त्री 2' ला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतु 'वेदा' तसेच 'खेल खेल में' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर मागे पडलेले दिसून येत आहेत.

मिडिया रिपोर्टच्या आकड्यांनुसार 15 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या 'वेदा' चित्रपटाची कमाई पहिल्या दिवशी अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या चित्रपटापेक्षा जास्त होती. 'वेदा' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी 6.3 कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर मात्र या चित्रपटाच्या कमाईचा आलेख घसरला. या चित्रपटाने नंतर प्रत्येक दिवशी साधारण 1-2 कोटी रुपये कमाई केली. चित्रपट प्रदर्शनाच्या दहाव्या दिवशी'वेदा' चित्रपटाने अवघी 60 लाख रुपयांची कमाई केली.

'खेल खेल में' चित्रपटाची कमाई वाढली 

प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारचा 'खेल खेल में' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 5.05 कोटी रुपये कमवत बॉक्स ऑफिवर  मानाचं स्थान निर्माण केलं. त्यानंतर जॉन अब्राहमच्या 'वेदा' या चित्रपटामुळे अक्षयच्या 'खेल खेल में' या चित्रपटाचा आलेख खाली आला. नंतर मात्र 'खेल खेल में' या चित्रपटाने 'वेदा' ला मागे टाकत चांगली कमाई केली. नवव्या दिवशी 'वेदा' चित्रपटाने 60 लाख रुपये कमाई केली, तेव्हा 'खेल खेल में' या चित्रपटाने 70 लाख रुपयांची कमाई केली. 

दोन्ही चित्रपट ठरले फ्लॉप.. 

अभिनेता जॉन अब्राहम तसेच अभिनेत्री  शर्वरी वाघ यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'वेदा' या चित्रपटाने भारतात दहा दिवसांत 18.50 कोटी रुपयांची कमाई केली. तर अक्षय कुमारच्या 'खेल खेल में' या चित्रपटाने 21.30 कोटींचा गल्ला जमवला आहे. 'खेल खेल में' या चित्रपटाने 'वेदा' या चित्रपटापेक्षा 2.8 कोटींची जास्त कमाई केली.

मिडिया रिपोर्टनुसार निखील अडवाणी दिग्दर्शित 'वेदा' चित्रपटाने आतापर्यंत 60 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच मुदस्सर अजिज दिग्दर्शित 'खेल खेल में' या चित्रपटाने 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

हेही वाचा :

बॉलिवूडचा जलवा, साऊथचा तडका, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' भन्नाट चित्रपट माहिती आहेत का?

Sharvari Wagh : शर्वरी वाघ, आलिया भटसोबत काश्मीर खोऱ्यात करणार शुटींग, ॲक्शन पॅक अल्फा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र
Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget