एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sharvari Wagh : शर्वरी वाघ, आलिया भटसोबत काश्मीर खोऱ्यात करणार शुटींग, ॲक्शन पॅक अल्फा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

Munjya Actress Sharvari Wagh : आलिया भटसोबत अल्फा चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला जाण्याची खूप उत्सुक असल्याचं अभिनेत्री शर्वरी वाघने सांगितलं आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी यंदाचं वर्ष खूप खास ठरलं आहे. अभिनेत्री शर्वरी वाघच्या मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  100 कोटींची कमाई आहे. या चित्रपटातील 'तरस' या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. हे गाणं ट्रेंडमध्ये पाहायला मिळालं. मुंज्यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटासह शर्वरीचा 'महाराज' चित्रपटही हिट ठरला. जुनैद खान आणि शर्वरी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडला. यासोबत 'वेदा' चित्रपटामधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिने खूप प्रशंसा मिळवली आहे.

अल्फा चित्रपटामध्ये शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत

या वर्षात एकामागून एक बॉल्कबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री शर्वरी वाघ लवकर स्पाय युनिव्हर्सचा एक भाग होणार आहे. शर्वरी वाघ यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच झळकणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम लवरकपत दुसऱ्या शुटींग शेड्यूलसाठी काश्मीरला रवाना होणार आहेत. चित्रपटाची शूटिंग काश्मीरच्या सुंदर खोऱ्यात होणार आहे. अल्फा चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला जाण्याची खूप उत्सुक असल्याचं अभिनेत्री शर्वरी वाघने सांगितलं आहे.

आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करणार

अल्फा चित्रपटाच्या सेटवर पुन्हा जाण्यासाठी खूप उत्सुक

अभिनेत्री शर्वरी वाघ मोठ्या ॲक्शन एंटरटेनर अल्फा चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अल्फा चित्रपटामध्ये शर्वरी सुपरस्टार अभिनेत्री आलिया भट्टसोबत दिसणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम सदस्य दुसऱ्या शेड्यूलच्या शूटिंगसाठी काश्मीरला जात आहेत आणि 26 ऑगस्टपासून काश्मीर खोऱ्यात चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना शर्वरी वाघ म्हणाली की, "मी अल्फा चित्रपटाच्या सेटवर पुन्हा जाण्यासाठी खूप उत्सुक असून याची आतुरतेने वाट बघत आहे. हे शेड्यूल खूपच रोमांचक असणार आहे. अल्फा चित्रपटाची टीम काही काळानंतर पुन्हा भेटत आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण काश्मीर शेड्यूलसाठी पूर्णपणे सज्ज आहोत."

View this post on Instagram
 
A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

"सर्वकाही शिकण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न"

शर्वरी पुढे सांगितलं की, "जेव्हा मी चित्रपटाच्या सेटवर असते, तेव्हा मी एकदम चॉकलेटच्या दुकानातील एका मुलासारखी उत्साही असते आणि अल्फाच्या सेटवर, मी खूप उत्साही असते. सर्वकाही शिकण्याचा आणि स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करते. करिअरच्या सुरुवातीलाच अशी संधी मिळणे खरोखरच एक आशीर्वाद आहे. बॉलिवूडमधील मेगास्टार्सचा सहभाग असलेल्या अशा फ्रँचायझीचा भाग असल्यामुळे मी आनंदी आहे."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget