एक्स्प्लोर

Nagpur : या 22 अनधिकृत शाळांमध्ये 'अॅडमिशन' नकोच!

एकीकडे पाल्यांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु आहे. मात्र दुसरीकडे नागपूर शहर आणि जिल्ह्यात अनधिकृत शाळांचा सुळसुळाट आहे. पालकांना सतर्क करण्यासाठी शिक्षण विभागाने 22 शाळांची यादी जाहीर केली आहे.

नागपूरः आगामी 2022-2023 शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली आहे. पहिली ते दहावीपर्यंत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरु झाली आहे. मात्र अनधिकृत शाळांची निवड केल्यास पुढे पाल्यांची फसगत होऊ शकते. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नागपूर शहरात आणि ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरु असलेल्या 22 शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये चुकूनही मुलांचे प्रवेश करू नका, असे आवाहन विभागाने केले आहे. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी याबाबत परिपत्रक काढले आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही, असा इशाराच विभागाने दिला आहे.

व्यवस्थापनाला एक लाखांचा दंड

अनधिकृत शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या हिंगणा तालुक्यातील आहे बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 18 नुसार कुठलेही व्यवस्थापन विनापरवानगी शाळा सुरु करु शकत नाही, अन्यथा त्या कलम 18 (5) नुसार कारवाई पात्र आहे. या सर्व शाळांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. संबंधित अनधिकृत शाळा सुरु राहिल्यास व्यवस्थापनास एक लाखांचा दंड व सूचना देऊनही शाळा बंद न केल्यास प्रतिदिवस 10 हजारांचा दंड ठोठविण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याचा या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास ही जबाबदारी पालकांची राहील, असेही शिक्षणाधिकारी कुंभार यांनी कळविले आहे.

या शाळा अनधिकृत

विनापरवानगी सुरु असलेल्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये काटोल तालुक्यातील सनशाइन इंग्लिश मीडियम स्कूल पंचवटी, कामठी तालुक्यातील बुद्धिस्ट इंटरनॅश्नल स्कूल येरखेडा, त्रिमूर्ती पब्लिक कॉन्व्हेंट बाजारगाव, सिद्धिविनायक स्कूल बुटीबोरी, तथास्तु इंग्लिश स्कूल बेलतरोडी, न्यू प्रेरणा कॉन्व्हेंट टाकळघाट, ब्रिलियंट इंग्लिश स्कूल वानाडोंगरी, सार्थक इंग्लिश स्कूल राजीवनगर, एस.के. इंटरनॅशनल स्कूल इसासनी, क्रांतीज्योती सावित्रिबाई फुले कॉन्व्हेंट सिर्सी, उमरेड यांचा समावेश आहे.

शहरातील या शाळा अनधिकृत

नागपूर शहर हद्दीतील अनधिकृत शाळांमध्ये एक्सल इंटरनॅश्नल स्कूल कळमना, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल दाभा, दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल इंदोरा, मदर्स किड्स स्कूल बिनाकी, एलिझाबेथ कॉन्व्हेंट सेमिनरी हिल्स, दार-ए-मदिना इंग्लिश स्कूल शांतिनगर, मदरसा दारुलम तजुलवरा गर्ल्स गांधीबाग, मदरसा दारुलम तजुलवरा बॉईज गांधीबाग, न्यू रहेमानिया इंग्लिश प्रायमरी स्कूील मोमीनपुरा याचा समावेश आहे.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget