Raigad : कुंडलिका नदीतील अपघातप्रकरणी नवी माहिती; चौथा मृतदेह ही बचाव पथकाच्या हाती, गावात एकच शोककळा
Raigad Kundlika River Accident : कुंडलिका नदीतील अपघातप्रकरणी नवी माहिती समोर आली असून बुडालेल्या चौघांपैकी चौथा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे.
रायगड : कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेतील नवी माहिती समोर आली आहे. नदीतील बुडालेल्या चौघांपैकी चौथा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला आहे. आज दुपारी मृतदेह शोधण्यात पोलीस आणि बचाव पथकाला यश आले आहे. सोनी सोनार (वय 27) अस हाती लागलेल्या चौथ्या मृतदेह तरुणीचे नाव आहे. सोनी सोनार यांचा कालपासून कुंडलिका नदीत शोध सुरू होता. अखेर आज उशिरा ही शोधमोहीम सुरू असताना चौथा मृतदेह ही हाती लागलाय
रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील रेवाळमध्ये कुंडलिका नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. यातील बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातातील चौघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलं आहे. सिद्येश राजेंद्र सोनार (21), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (16), काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) असं मृतांची नावं आहेत. मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला आहे.
चौघांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने शोककळा
माणगाव तालुक्यातील रेवाळजे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे. सिद्देश राजेंद्र सोनार(21) आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर(16) यांचे मृतदेह बाहेर शनिवारीच काढण्यात यश आलं होते. तर चौघांपैकी तिसरा मृतदेह रात्री उशिरा शोधण्यात पोलिस आणि बचाव पथकाला यश आले होते. तर शेवटचा सोनी सोनार (27) या बेपत्ता असल्याने आज पुन्हा शोध मोहीम राबवली असता चौथा मृतदेह ही बचाव पथकाच्या हाती लागलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. मिळालेल्या दोघांना शव विच्छेदनासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) यांचे मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यात आता यश आले असून चौघांच्या मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे.
आजीच्या गावी आल्या अन्...
बुडालेले सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. त्यानंतर ते सर्वजण कुंडलिका नदीमध्ये पोहायला गेले. अशात सिद्देश सोनारला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी सिद्धी, काजल आणि सोनी या तिघीही नदीच्या आतमध्ये गेल्या.
सिद्देशला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी त्या सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईहून आजीच्या गावी आले असताना या चारही जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा:
- Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं