Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
Jalgaon Crime News : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्याच पतीला संपवलं आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे.
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. तुषार चौधरी या तरुणाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता, मयत तुषार याची पत्नी आणि सागर चौधरी या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर पोलीसांनी मृतदेह आढळून आलेल्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता, तुषार आणि सागर चौधरी हे एकाच मोटार सायकलवरून जाताना आढळून आले होते. या घटनेचा आधार घेत पोलिसांनी तुषारची पत्नी आणि तिचा प्रियकर सागर चौधरी यांना पोलीस खाक्या दाखविताच त्यांनी या घटनेची कबुली दिली आहे. तुषार चौधरी यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून संशयित सागर चौधरी आणि तुषारच्या पत्नीला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे.
वाद सोडविण्यासाठी मध्यवस्ती करणाऱ्या तरुणाची हत्या
अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात किरकोळ वादातून एका 18 वर्षीय तुषार देडे नामक तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. तुषार आणि त्याचा मित्र महेश धाबी हे रात्रीच्या वेळी बारकू पाडा परिसरात असताना आरोपी समीर मुन्ना वाघे याचे महेश सोबत किरकोळ वाद सुरू असताना हा वाद सोडविण्यासाठी मध्यवस्ती पडलेल्या तुषार देडे याला समीर मुन्ना वाघे याने चाकूने भोसकले. तर या झटापटीत तुषार गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुषारला उपचारांसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर महेश हा गंभीर जखमी झाला असून हल्लेखोर समीर मुन्ना वाघे फरार झाला आहे. अंबरनाथ शिवाजी नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध घेत आहे. मात्र या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
86 लाख रुपयांचा गुटखा जप्त
गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर पोलिसांनी रात्री सापळा रचून राजस्थानमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा कंटेनर राष्ट्रीय महामार्गावर पकडला . या कंटेनर मध्ये जवळपास 63 लाख रुपयांच्या गुटख्यासह पोलिसांनी 86 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. अलीकडच्या काळात ही पोलिसांची मोठी कारवाई मानल्या जात आहे. या कारवाईत पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली असून पुढील तपास सुरू केलाय.
हे ही वाचा