चिमुकल्या बहिणींच्या अत्याचार अन् हत्येने पुणे हादरलं, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे राजगुरूनगरमध्ये पोहचल्या
Rajgurunagar News : राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. या घटनेनं पुणे हादरल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे थेट राजगुरूनगरमध्ये पोहचल्यात.
Neelam Gorhe on Rajgurunagar Crime News : पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये (Rajgurunagar) शेजारीच वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमाने चिमुकल्या मुलींवर अत्याचार करुन खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध नोंदवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam gorhe) या राजगुरूनगरमध्ये पोहचल्या असून त्यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. या घटनेनं पुणे हादरल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे थेट राजगुरूनगरमध्ये पोहचल्यात. नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती नीलम गोऱ्हे घेतायेत. त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट त्यांनी घेतली आहे.
मुलींवर अत्याचार थांबवायचे असतील तर...., - नीलम गोऱ्हे
राजगुरूनगरमध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली. यानिमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची कबुली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे दिली. नीलम गोऱ्हे यांनी राजगुरूनगरमध्ये जाऊन नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखी काय-काय समोर आलंय, याची माहिती गोऱ्हेनी घेतली. त्यानंतर पीडित कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाईल, मात्र या मदतीमुळं त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाहीत. त्यामुळं मुळतः ही विकृती ठेवण्याची गरज आहे. यासाठी सरकार कठोर पावले उचलेल, असा विश्वास गोऱ्हेनी व्यक्त केला.
आता यापुढं परप्रांतीयांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे. सोबतच ते ज्या राज्यातून येतायेत तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायला हवा. असं गोरेंनी नमूद केलं. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी व्हायला हवी, यासाठी आम्ही ही पाठपुरावा करू. असं म्हणतानाचं फास्टट्रॅक मध्ये चालणारे खटले पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात, हे पाहणं आणि प्रलंबित प्रकरणं निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्टमध्ये करावीत, अशी मागणी करताना न्यायव्यवस्था सुबक करण्यावर सरकारने भर द्यावा. असं ही गोऱ्हेनी नमूद केलं.
पोलिसांकडे प्रत्येकाची माहिती कशी येणार?- शिवाजी आढळराव पाटील
राजगुरूनगरमध्ये घडलेली घटना ही खळबळजनक आणि संताप आणणारी घटना आहे. असा विकृतपणा आपल्या उत्तर पुण्यात फारसे घडलेले नाहीत. चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून हत्या करणे ही अशोभनीय गोष्ट आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगारासाठी येणाऱ्या कामगारांची माहिती ही घर मालकांनी देण्याची गरज आहे. यासाठी जागरूक राहायला हवं, तेंव्हा अशा घटना आपल्याला टाळता येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शिवाजी आढळरावांनी दिली आहे.
सरकार याबाबत कठोर पावलं उचलत आहे. या पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार. आर्थिक मदतीसाठी प्रयत्नशील राहीन. लोकसंख्या वाढलेली आहे. पोलिसांकडे प्रत्येकाची माहिती कशी येणार? प्रत्येक घरात कोण राहत आहे, हे पोलीस घरा-घरात जाऊन चौकशी कशी करेल? हे शक्य आहे का? त्यामुळं नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवायला हवी. असेही ते म्हणाले.
दुसरीकडे, राजगुरूनगरमध्ये सकाळ पासून काही व्यापाऱ्यांनी स्वतःहुन दुकान बंद ठेवली आहेत. चिमुरड्या बहिणींवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे काही प्रमाणात असे पडसाद उमटत आहेत. आरोपीला तातडीनं फाशी द्यावी अशी मागणी केली जातीये. या मागणीला पाठिंबा देण्यासाठी अनेक व्यापारी दुकानं बंद ठेवत आहेत. इतरांनी ही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विविध संघटना आवाहन करत आहेत.
हे ही वाचा