Indapur Crime: पेन्शन लाटण्यासाठी वृद्ध आईला मुलाकडून अमानुषपणे मारहाण, इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पेन्शन लाटण्यासाठी छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजयंता जाधव या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत.

बारामती : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलाने अमानुषपणे आईला मारहाण केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिलीप जाधव असे अमानुषपणे मारहाण केलेल्या आरोपीचे नाव आहे. वैजयंता जाधव यांनी आपल्या मुलाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून इंदापूर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पेन्शन लाटण्यासाठी छळ केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजयंता जाधव या इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथील रहिवासी आहेत.
आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. स्वतःच्या सर्व आवडी-निवडी बाजूला ठेवून ती आपल्या मुलांसाठी राबत असते. मुले मोठी झाली की त्यांना आई नकोशी होते. वैजयंता यांना त्यांच्या मोठ्या मुलाने राहत्या घरी मारहाण केली तसेच शिवीगाळ, दमदाटी करून डोक्यात लाकडाचा ओंडका फेकून मारल्याने त्या जमिनीवर कोसळल्या. आशा आशयाची तक्रार वैजयंता जाधव यांनी दिली आहे. ही घटना 24 ऑक्टोबर रोजी घडली. 25 तारखेला वैजयंता चक्कर येऊ लागली त्यामुळे त्याच्या धाकट्या मुलाने जाधव यांना इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर त्यांनी आज इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली
इंदापूर पोलिसांनी दिलीप यांच्याविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात आज गुन्हा नोंद केला आहे. इंदापूर पोलिसांनी आरोपी विरोधात भा.दं.वि. कलम 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. मुलाने आईला मारहाण का केली याची अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु आईला मिळणारी पेन्शन मुलाला पाहिजे होती त्यामुळे मुलाने आईला मारहाण केल्याची चर्चा आहे. परंतु याबद्दल अजून अधिकृत माहिती मिळालेली नाही. इंदापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
