एक्स्प्लोर

Sanjay Raut: गुढीपाडव्यालाही दंगलीचा प्रयत्न करतील, सरकार तुमचंच, मग दंगली कशाला पेटवता? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

Nagpur riots Sanjay Raut: संजय राऊत यांनी नागपूरमध्ये सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. राज्यात गुढीपाडव्याला दंगल घडवण्याचा प्लॅन.

मुंबई: नागपूरमध्ये जी दंगल उसळली त्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहायला हवे. दंगलखोर कुठल्या जातीचा, कुठल्या पक्षाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रसारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावले उचलावीत. दंगल पेटवणारे कोण आहेत आणि त्यांनी दंगल (Nagpur Riots) का पेटवली, याचा शोध घ्यावा. उद्या गुढीपाडव्यालाही (GudiPadwa 2025) आपलीच लोकं दंगली उसळवण्याचा प्रयत्न करतील, असे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगल माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार तुमचं आहे तर दंगली कशाला भडकवत आहात? सरसंघचालक मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कुदळ-फावडा घेऊन जावे आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची लोकांची इच्छा पूर्ण करावी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा वेगळी आहे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं महत्त्व कमी करायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे. औरंगजेबाजी कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे स्मारक आहे. बाबरी आंदोलन हे वेगळे होते. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका काय होती, हे तुम्ही आम्हाला सांगू नये. मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात बाहेरून येऊन दंगली पेटवल्या जात आहेत. हे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ही विश्व हिंदू परिषदेची लोक आहेत किंवा संघाची लोक आहेत. त्यांचे चेहरे कळत आहेत. देवेंद्र फडणवीसांना ती लोक माहीत असतील.  हिंदूंना भडकविण्यासाठी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत, हा नवीन पॅटर्न आता सुरू आहे. महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे. अशा दंगली पेटवून 2029 च्या निवडणुकींना सामोरे जायचं असा हा दंगल पॅटर्न आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचं महिमामंडन होणार. औरंगजेबाच्या कबरीचं उदत्तीकरण हे महाराष्ट्रात कोणीही करू नये, तुमचीच माणसं हे करत आहेत. इतिहास मान्य केल्यावर तुमची माणसं जर कुदळ फावडी घेऊन तिकडे गेली असती तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा  व मोकोको लावा, ही संघटित गुन्हेगारी आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

सरकारची बदनामी टाळण्यासाठी औरंगजेबाचे प्रकरण उकरुन काढलेय: संजय राऊत

सरकार बदनाम होत आहे. त्यामुळे अधिवेशनात अनेक प्रश्न दाबण्यासाठी हे औरंगजेबाचे प्रकरण बाहेर काढले आहे. जयकुमार रावल यांनी को-ऑपरेटिव बँकेमध्ये आपल्या नातेवाईकांना कोठेवाडी रुपये दिले. गुजरातमधील नातेवाईकांना महाराष्ट्रातील को-ऑपरेटिव्ह बँकेतील पैसे देण्यात आले. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. हा एसआयटीच्या अहवालातील आरोपी क्रमांक तीन जयकुमार रावल आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सहीने ती एसआयटी दाबण्यात आली. सहकारी बँकेत असे घोटाळे होतात तेव्हा मुलुंडमधील ना#$ पोपटलाल हा रस्त्यावर येतो. मग जनतेचे 180 कोटी लुटणारे जयकुमार रावल हे मंत्रिमंडळात का? हा प्रश्न त्या मुलुंडच्या ना#$ पोपटलाला किंवा देवेंद्र फडणवीस यांना का पडू नये? फडणवीस यांनी या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे. परंतु असे विषय दाबण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचे प्रकरण उकरून दंगली भडकवली जात आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

आणखी वाचा

जमावाने गाड्या जाळल्या, पोलिसांना मारायला गट्टू उचलला अन्.... नागपूरच्या चिटणीस पार्कमधील नागरिकांनी सांगितला भयावह अनुभव

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर भाजपच्या जिल्ह्याध्यक्षांचे गंभीर आरोप, बुलढाण्यात राजकीय वातावरण तापलं
शिवसेना आमदार संजय गायकवाडांवर भाजपच्या जिल्ह्याध्यक्षांचे गंभीर आरोप, बुलढाण्यात राजकीय वातावरण तापलं
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?
राज्यात ऑपरेशन टायगर नाही, पण ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंकडे गेले असतील तर... नेमकं काय म्हणाले बावनकुळे?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Personal Loan : वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
वैयक्तिक कर्ज घ्यायचा विचार करताय? 'या' 7 गोष्टींबाबत सतर्क राहा, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता 
मोठी बातमी : मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
मोदी, शाहांसोबत शरद पवार, अडीच वर्षांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पोस्टरवर थोरल्या पवारांचा फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2026 | शुक्रवार
SIP : गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
गुंतवणूकदारांचा एसआयपीवरील विश्वास वाढला, SIP खात्यांची संख्या 10 कोटींच्या पार, 2025-26 मध्ये विक्रमी गुंतवणूक
Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
भाडेतत्त्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
RBI : डिजीटल फसवणूक रोखण्यासाठी मास्टरस्ट्रोक, UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
UPI वरुन 10 हजार रुपये पाठवल्यास 1 तास वाट पाहावी लागणार,आरबीआय नवा नियम लागू करण्याची शक्यता
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही; पाकिस्तानातील चर्चेला काही तास बाकी असतानाच इराणचा थेट पवित्रा? अमेरिका काय करणार, चर्चेसाठी ठरलेलं शिष्टमंडळ सुद्धा पोहोचलं नाही
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
बंगालमधील लाडक्या बहिणींना भाजपकडून महिन्याला 3 हजार, बेरोजगार तरुणांना 3 हजार, गर्भवतींना 21 हजार, शेतकऱ्यांना वर्षाला 9 हजार, सरकारी कर्मचाऱ्यांना 45 दिवसांत सातवा वेतन आयोग, सहा महिन्यात समान नागरी कायदा
Embed widget