एक्स्प्लोर

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्यात, आता पेट्रोल-डिझेलचे दरही वाढणार?

Petrol Diesel Price : देशात दीड वर्षाहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज 511 वा दिवस आहे. आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Rate on 30th August 2023: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचा दर 84 प्रति बॅरलच्या आसपास नोंदवला जात होता, मात्र आज 30 ऑगस्ट रोजी सकाळी कच्च्या तेलाच्या दरांत आणखी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड तेल 85 डॉलरच्या पुढे नोंदवलं जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींच्या आधारावरच देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) निश्चित केल्या जातात. मात्र, देशात तेलाच्या किमतींचा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही.

देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. आज म्हणजेच, 30 ऑगस्ट रोजी अपडेट झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनुसार, आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. 

कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सकाळी, 30 ऑगस्ट रोजी, ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल 85.68 डॉलरवर आहे. तसेच, WTI क्रूड प्रति बॅरल 81.43 डॉलरवर पोहोचलं आहे. मात्र, त्यानंतरही भारतीय बाजारातील तेलाच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.

दिल्ली, मुंबईसह इतर महानगरांमधील दर काय? 

देशाची राजधानी दिल्लीबद्दल बोलायचं झालं तर, येथे पेट्रोलची किंमत प्रति लिटर 96.72 आणि डिझेलची किंमत 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटरनं विकलं जात आहे.

दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

Petrol Diesel Price Today : तुमच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती जाणून घ्या

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price Today: आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
आज सोने-चांदी स्वस्त की महाग? खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या दर
Mhada : मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
मुंबईच्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 सदनिकांचं वितरण 16 मार्चला, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gratuity Rules :  'या' चुकीमुळे कंपनी रोखू शकते ग्रॅच्युइटीचे पैसे
Gold Price: इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर
इराण-इस्रायल युद्ध सुरू असताना सोन्याच्या किमतीत घसरण का? आता दर वाढणार की कमी होणार? जाणून घ्या सविस्तर

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget