एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा शब्द, इतर राज्यांमध्ये किती मिळतात? विविध राज्यांना किती खर्च येणार?

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 2100 रुपये देण्याचा शब्द महायुतीनं दिला होता. इतर राज्यातही अशीच मदत महिलांना केली जाते.

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारनं जुलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. राज्य सरकारनं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष दक्षता घेतली. या योजनेच्या माध्यमातून अडीच कोटी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी करत नोव्हेंबरपर्यंतचे पाच महिन्यांचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा करण्यात आले. महायुतीची सत्ता आल्यास महिलांना 2100 रुपये देणार असल्याचा शब्द देण्यात आला होता. आता महायुतीची राज्यात सत्ता आली असून महिलांना 2100 रुपये दरमहा दिले जाणार का हे पाहावं लागेल. महाराष्ट्राप्रमाणं इतर राज्यात देखील महिलांच्या खात्यात थेट रक्कम पाठवणाऱ्या योजना सुरु आहेत. त्या राज्यात महिलांना किती रक्कम दिली जाते हे पाहावं लागेल. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कर्नाटक सरकारकडून गृहलक्ष्मी योजना चालवली जाते, या योजनेतून महिलांना 2 हजार रुपये दिले जातात. मध्य प्रदेशात लाडली बहेना आणि आसाममध्ये अरुणोदय योजनेतून  महिलांना दरमहा 1250 रुपये दिले जातात. 

छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेतून, दिल्ली सरकारकडून मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेतून, तामिळनाडू सरकारच्या मगलीर उरीमई थोगा योजनातून दरमहा 1 हजार रुपये महिलांना दिले जातात. 

पश्चिम बंगाल सरकारकडून लक्ष्मी भांडार योजनेतून  एक हजार ते 1200 रुपये दिले जातात. ओडिसा सरकार सुभद्रा योजनेतून महिलांना दरमहा 833 रुपये देतं. झारखंड सरकारनं देखील महिलांना दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला. हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री होताच ती रक्कम 1 हजार रुपये वाढवून अडीच हजारांवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. 

मध्य प्रदेशात शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारनं सुरु केलेल्या लाडली बहेना योजनेचा त्यांना फायदा झाला होता. भाजपचं सरकार मध्य प्रदेशात पुन्हा स्थापन झालं. महाराष्ट्रात देखील त्या प्रमाणं महायुतीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला. महायुतीचं सरकार देखील पुन्हा सत्तेत आलं आहे. 

या योजनांचा लाभ प्रामुख्यानं कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दिला जातो. राज्य सरकारचे कर्मचारी, प्राप्तिकर भरणाऱ्या महिला यांना या योजनेचे लाभ दिले जात नाहीत. महाराष्ट्रात या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र सरकारला 1500 रुपयांप्रमाणं महिलांना दरमहा रक्कम देण्यासाठी 46 हजार कोटींचा खर्च अपेक्षित होता. ज्यावेळी महिलांना 2100 रुपये दिले जातील त्यावेळी सरकारला 58 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील.  देशातील विविध राज्यातील सरकारांना अशा योजनांवर साधारपणे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च करावा लागत असल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या : 

Supreme Court : राज्यांचे पोलीस ED-CBI च्या अधिकाऱ्यांना अटक करु शकतात का? सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 19 March 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 19 March 2025 : 12 Noon100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 18 March 2025 : 11 AMOpposition Leader News | विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार? कोण होणरा विरोधी पक्ष नेता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
World Most Expensive Dog : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Video : बदल्यात कमीत कमी 55 किलो सोनं आरामात खरेदी करता येईल! जगातील सर्वात महागड्या श्वानाची नेमकी किंमत किती?
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
Embed widget