Maharashtra Budget : सोने चांदी आयातीवर मुद्रांक शुल्क माफ; अर्थसंकल्पात घोषणा, 100 कोटींच्या वित्तीय तुटीची शक्यता...
Maharashtra Budget : सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. मुद्रांक शुल्क माफ करण्यामुळे राज्यास अंदाजे शंभर कोटी रूपयांच्या महसुली तुटीची शक्यता आहे.
Maharashtra Budget : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये अजित पवार यांनी सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा केली आहे. मुद्रांक शुल्क माफ करण्यामुळे राज्यास अंदाजे शंभर कोटी रूपयांच्या महसुली तुटीची शक्यता आहे. परंतु, मुद्रांक शुल्क कमी केल्यामुळे रोजगार निर्मिती होईल असे, राज्य सरकारचे मत आहे.
सोने चांदीचे दागिणे बनवणारे छोटे-मोठे उद्योग, रिफायनरी आणि निर्यातीस चालणा देण्यासाठी राज्य सरकारकडून आयातीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच राज्यात रोजगार निर्मिती होऊन कर चुकवेगिरीला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र राज्यात आयात होणाऱ्या सोने आणि चांदीच्या डिलिव्हरी ऑर्डरच्या दस्तांवर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार सध्या आकारण्यात येणारे 0.1 टक्के मुद्रांक शुल्क माफ करण्यात येणार आहे. यामुळे राज्यास अंदाजे शंभर कोटी रूपयांच्या महसुली तुटीची शक्यता आहे.
सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी करण्याबाबत राज्य सरकारने जानेवारी महिन्यात एक समिती नियुक्ती केली होती. मुद्रांक शुल्क कमी केल्यास राज्याच्या महसुलावर किती परिणाम होईल? याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली होती. समितीला एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. एक महिन्यानंतर ही समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार होती. त्यानुसार अर्थसंकल्प सादर होण्याआधी या समितीने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर आज राज्याच्या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला. सोन्यावरील मुद्रांक शुल्क कमी करण्यात आल्यामुळे आता राज्यातील सोने चांदीचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदीच्या आयातीवरील मुद्रांक शुल्क कमी केले तर सोन्या चांदीच्या उद्योगात वाढ होईल. साहजिकच त्यामुळे या क्षेत्रात रोजगार निर्मीती होईल, असा तज्ञ्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयाचे सोने-चांदी व्यावसायिकांतून स्वागत होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maharashtra Budget : 'विकासाची पंचसूत्री' मांडल्याचा दावा करत सव्वाचार लाख कोटींचा अर्थसंकल्प, कोणत्या विभागाला किती निधी?
- Maharashtra Budget Top 10 Highlights: महाविकास आघाडीची 'पंचसूत्री'; अर्थसंकल्पातील सर्वात मोठ्या दहा घोषणा
- Maharashtra Budget : कर्जमाफी, अनुदानात वाढ; महाविकास आघाडीच्या बजेटमधून शेतकऱ्यांसाठी काय?
- Maharashtra Budget 2022 : शेतकऱ्यांना दिलासा, भूविकास बँकांचे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ, अजित पवारांची घोषणा