सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, सोन्याच्या दरात मोठी घसरण, कोणत्या शहरात किती दर?
आज सोन्याच्या दरात (Gold Price) घट झाली आहे. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 78150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Gold Price : सध्या देशात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला जर सोने (Gold) खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या दरात (Gold Price) घट झाली आहे. आज राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव 78150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 78000 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले आहेत. दरम्यान, गेल्या आठवड्यात सोने 1 हजार 640 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
जाणून घेऊयात कोणत्या शहरात किती दर?
दिल्लीत सोन्याचा भाव किती?
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,150 रुपये प्रति तोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याच्या दरात थोडी घसरण झाली आहे. त्यामुळं खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
कोलकाता आणि मुंबईत सोन्याचा भाव किती?
1 डिसेंबर 2024 रोजी मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई मध्ये सोन्याचा भाव किती?
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
भोपाळ आणि अहमदाबादमध्ये सोन्याचे दर किती?
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याच वेळी, भोपाळमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,050 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनौ आणि हैदराबादमध्ये सोन्याचा भाव काय?
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 78150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा भाव 71650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर आणि चंदीगडमध्ये सोन्याचा भाव किती?
देशातील या दोन्ही शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत समान आहे. दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, अखेर सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळं सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत, 'या' 11 राज्यात नियम लागू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
