Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेझ आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय महिलांकडे 24000 टन सोने असल्याचे अहवालातून समोर आले आहे.
Gold : जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतीय महिलांमध्ये सोन्याची आणि दागिन्यांची मोठी क्रेझ आहे हे स्पष्ट झाले आहे. भारतीय महिलांकडे एकूण 24000 टन सोने असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. पण सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे भारतातही दक्षिण भारतातील महिलांकडे सर्वाधिक सोने आहे.
तामिळनाडूतील महिलांकडे जगात सर्वाधिक सोने असल्याचे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. हे सुमारे 6,720 टन आहे. हा आकडा भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 28 टक्के आहे. अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशियासारख्या देशांतील महिलांकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यापेक्षाही ते अधिक आहे.
दागिने हे अनेक राज्याच्या परंपरा-संस्कृतीचा भाग
गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतीय महिलांकडे एकूण 24000 टन सोने आहे, त्यापैकी 40 टक्के दक्षिण भारतातील महिलांकडे आहे. तमिळनाडूतील महिलांची सोन्याच्या दागिन्यांची आवड मर्यादेपलीकडे असल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे. सोने हा राज्याच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे. जन्मापासून लग्नापर्यंत आयुष्यातील सर्व आनंदाच्या क्षणांमध्ये दागिन्यांना विशेष स्थान असते. सोन्यावरील या प्रेमामुळे त्याचा साठा वाढला आहे.
सोन्याच्या भावात वाढ होऊनही सोने खरेदी सुरुच
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, भारतात सोन्याला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. जे देशाच्या संस्कृती आणि परंपरेत महत्त्वाची भूमिका बजावते. सोन्याच्या भावात वाढ होऊनही लोकांची दागिने खरेदीची उत्सुकता कमी झालेली नाही. बरेच लोक याला गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय मानतात. सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असले तरी त्याचा लोकांवर काहीही परिणाम होत नाही. लोकांमध्ये दागिने खरेदीची क्रेझ आहे.
कोणत्या देशात किती सोने आहे?
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, भारतीय आयकर कायद्यानुसार, विवाहित महिलांना 500 ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची परवानगी आहे. तर अविवाहित महिला 250 ग्रॅम आणि पुरुष 100 ग्रॅमपर्यंत सोने ठेवू शकतात. दरम्यान, जागतिक सुवर्ण परिषदेनं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेकडे 8000 टन, जर्मनीकडे 3300 टन, इटलीकडे 2450 टन, फ्रान्सकडे 2400 टन आणि रशियाकडे 1900 टन सोने आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
