..म्हणून शेअर बाजारात सातत्याने पडझड? विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून 35 हजार कोटी काढले
Foreign Portfolio Investors,FPIs : येत्या काही दिवसांत युद्धपरिस्थिती निवळली नाही तर जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारावर याचे आणखी विपरित परिणाम होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
Foreign Portfolio Investors,FPIs : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (Foreign Portfolio Investors,FPIs) फेब्रुवारीमध्ये भारतीय बाजारातून 35 हजार 506 कोटी रुपये काढले. एफपीआईची भारतीय बाजारपेठेत विक्रीचा हा सलग पाचवा महिना आहे. परिणामी शेअर बाजारात गेल्या काही दिवसांत प्रचंड उलाढाल पाहायला मिळते आहे. येत्या काही दिवसांत युद्धपरिस्थिती निवळली नाही तर जागतिक बाजारपेठेसह भारतीय शेअर बाजारावर याचे आणखी विपरित परिणाम होऊ शकतात असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
ऑक्टोबर 2021 पासून सतत माघार
ऑक्टोबर 2021 पासून विदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून सतत माघार घेत आहेत. मार्च 2020 पासून फेब्रुवारी 2022 मध्ये एफपीआयचा जावक सर्वाधिक आहे. त्यावेळी एफपीआयने भारतीय बाजारातून 1 लाख 18 हजार 203 कोटी रुपये काढले होते. डिपॉझिटरी डेटानुसार, एफपीआयने1 ते 25 फेब्रुवारी दरम्यान इक्विटीमधून 31 हजार 158 कोटी रुपये आणि कर्ज विभागातून 4 हजार 467 कोटी रुपये काढले. यादरम्यान त्यांनी हायब्रीड उपकरणांमध्ये 120 कोटींची गुंतवणूक केली आहे.
रशिया-युक्रेन तणावामुळे सावधगिरी
“यूएस मध्यवर्ती बँकेने काही प्रोत्साहित उपाय मागे घेण्याची आणि व्याजदरात उशीरा वाढ केल्याची घोषणा केल्यानंतर एफपीआयकडून बाहेरचा प्रवाह वाढला. याशिवाय रशिया-युक्रेन तणावामुळे एफपीआय सावध पवित्रा घेत आहेत आणि भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांपासून दूर राहणं पसंत करते आहे असं मॉर्निंगस्टार इंडियाचे असोसिएट डायरेक्टर हिमांशू श्रीवास्तव यांचे म्हणणे आहे.
आणखी पैसे काढू शकतात -
दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयाचा कल, कच्च्या तेलाच्या किमती, अमेरिकेतील रोख्यांवर उत्पन्न यावरून एफपीआयचा कल निश्चित केला गेला असता. कारण यूएस मध्ये, एफपीआयकडून १० वर्षांच्या रोख्यांवर परतावा वाढल्यावर बाँड मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. सध्या या सर्व गोष्टींचा परिणाम एफपीआयवर होतो आहे आणि यामुळेच विदेशी गुंतवणूकदार आणखी पैसे काढू शकतात अशी शक्यता कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च प्रमुख श्रीकांत चौहान यांनी वर्तविली आहे.