
Vastu Tips : घराच्या देव्हाऱ्यात 'या' 4 वस्तू ठेवाच, नकारात्मकता असो वा आर्थिक तंगी सर्व समस्या झटक्यात होतील दूर
Vastu Tips : देवाच्या मंदिरात, देव्हाऱ्यात पूजेचं साहित्य ठेवलं जातं. तर, अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देव्हाऱ्यात अन्य अनेक गोष्टी ठेवल्या जातात.

Vastu Tips : हिंदू धर्मातील प्रत्येक घरात देव्हारा हा आढळतोच. या देव्हाऱ्यात (Temple) विविध देवाची मूर्ती, फोटो आणि पूजेचं साहित्य ठेवलं जातं. याच ठिकाणी देवाची भक्ती केली जाते. भक्त आणि देवामधला संवाद साधण्याचं हे एक स्थान आहे.
याच देवाच्या मंदिरात, देव्हाऱ्यात पूजेचं साहित्य ठेवलं जातं. तर, अनेक लोक माहितीच्या अभावी घराच्या देव्हाऱ्यात अन्य अनेक गोष्टी ठेवल्या जातात. ज्या कधी कधी ठेवणं योग्य नाही. वास्तू शास्त्रात, देव्हाऱ्याच्या वस्तूशी संबंधित काही नियम सांगण्यात आले आहेत या गोष्टींची काळजी घेतल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.
यासाठीच घराच्या देव्हाऱ्यात कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
1. कलश
वास्तूशास्त्राच्या नियमानुसार, घराच्या देव्हाऱ्यात कलश स्थापित केल्याने व्यक्तीवर येणारे अनेक संकट दूर करता येतात. तसेच, यामुळे तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ होते. तसेच, कलश घरी असल्याने घरात देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते. यामुळे पैशांची चणचण भासत नाही.
2. गंगाजल
घरात होणारी पूजा किंवा अन्य शुभ कार्यात गंगाजलचं फार मोठं महत्त्व आहे. हे गंगाजल घरात शिंपडल्याने व्यक्ती तसेच घरातील जागा पवित्र होते. त्यामुळे गंगा जलला घरात ठेवणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की, गंगा जल घरात ठेवल्याने व्यक्तीला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना देवी-दैवतांचा आशीर्वाद मिळतो.
3. शंख
देव्हाऱ्यातील इतर वस्तूंप्रमाणेच शंख देखील ठेवणं फार शुभकारक मानलं जातं. तुम्हाला सुद्धा शुभ परिणाम हवे असतील तर दक्षिणावर्ती शंखात गंगाजल सुद्धा घराच्या देव्हाऱ्यात ठेवू शकता. असे केल्याने देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते.
4. तुळस पत्र
तुळस पत्राला हिंदू धर्मात फार पवित्र आणि पूजनीय मानण्यात आलं आहे. तुळस पत्राची पूजा केली जाते. तसेच, भगवान कृष्णाच्या प्रसादात तुळस पत्र फार महत्त्वाचं मानण्यात आलं आहे. असं म्हणतात की, घराच्या देव्हाऱ्यात तुळस पत्र ठेवल्याने मंदिराची पवित्रता फार वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
Chandra Grahan 2024 : 'या' महिन्यात होणार वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण; भारतात कधी दिसणार आणि काय परिणाम होणार?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
