एक्स्प्लोर

PF : मोठी बातमी, पीएफचे पैसे काढण्यासाठी चेकचा फोटो अपलोड करण्याची झंझट मिटली, ईपीएफओनं नियम बदलला

EPF : पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी यूएएन पोर्टलवरुन ऑनलाईन क्लेम सादर करावा लागत होता. आता त्या नियमात बदल करण्यात आला आहे.

EPFO नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं पीएफ खात्यातून पैसे काढण्यासंदर्भातील नियमात बदल केला आहे.पीएफ खात्यातून विविध कारणांसाठी पैसे काढता येतात. यामध्ये घर खरेदी, लग्न, आजारपण आणि इतर कारणांसाठी पैसे काढता येतात. मात्र, यासाठी यूएएन पोर्टलवरुन ऑनलाईन क्लेम करावा लागतो. क्लेम सादर करताना म्हणजेच फॉर्म नंबर 31 भरताना यापूर्वी बँक खात्याचा तपशील, खातेदाराचं नाव असणारा चेकचा फोटो अपलोड करावा लागत असे. मात्र, ईपीएफओनं या संदर्भातील नियम बदलला असून  क्लेम सादर करताना चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही. 

ईपीएफओच्या यूएएन पोर्टलवरुन क्लेम सादर करताना आता चेकचा फोटो अपलोड करावा लागणार नाही किंवा बँक खात्याची माहिती देखील द्यावी लागणार नाही. याशिवाय ज्या कंपनीत नोकरी करता तिथून वेरिफिकेशनची गरज लागणार नाही. यापूर्वी क्लेम सादर करताना बँख खात्याच्या एक कॅन्सल चेकचा फोटो किंवा पासबूकची पडताळणी केलेली कॉपी अपलोड करावी लागत असे. याशिवाय जिथं नोकरी करतो तिथून बँक खातं  वेरिफाय करावं लागत होतं. 

ईपीएफओकडून दोन्ही प्रक्रिया समाप्त करण्यात आल्या आहेत. आता बँक खातं पहिल्यांपासून यूएएन खात्याशी लिंक असतो आणि वेरिफाय केलेला असतो. यामुळं अतिरिक्त कागदपत्रांची गरज लागत नाही यामुळं क्लेम नाकारला जाण्याची शक्यता कमी होते. खराब किंवा अस्पष्ट अपलोड केलेल्या फाईलमुळं निर्माण होणाऱ्या तक्रारी घटतील. 

ही सूट यापूर्वी काही केवायसी वेरिफाय असलेल्या सदस्यांसाठी लागू होती. ही सुविधा 28 मे 2024 ला सुरु करण्यात आली होती. आतापर्यंत याचा फायदा 1.7 कोटी सदस्यांना झाला आहे. आता ही सुविधा सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आली आहे. 

ईपीएफओचे 7.74 कोटी सक्रीय दस्य आहेत. ज्यामध्ये 4.83 कोटी सदस्यांनी आपली बँक खाती यूएएन क्रमांकाशी लिंक केलेली आहेत. तर, 14.95  लाख सदस्यांची बँक खाती सध्या एम्पलॉयर जवळ प्रलंबित आहेत. आता एम्पलॉयरच्या मंजुरीची आवश्यकता नाही. त्यामुळं या सदस्यांना दिलासा मिळेल आणि क्लेमची प्रक्रिया  वेगवान होईल. 

बँक खातं बदलण्याची प्रक्रिया देखील सोपी

ज्या सदस्यांना यूएएन क्रमांकासोबत जोडलेले बँक खातं बदलायचं असल्यास आणि नवा बँक खाते क्रमांक जोडायचा असल्यास ही प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे. नवा बँक खाते क्रमांक, आयएफसी क्रमांक आणि ओटीपी नोंदवून वेरिफाय करा. यामुळं पीएफ क्लेम मंजूर होण्याची प्रक्रिया वेगवान होईल.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget