धक्कादायक! नाशिकमध्ये बंदुकीचा धाक दाखवून हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण, पार्टनरकडून घेतली 15 लाखांची खंडणी
नाशिकमध्ये एका हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. अपहरण करुन त्याच्या पार्टनरकडून 15 लाखांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik : नाशिकमध्ये एका हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. अपहरण करुन त्याच्या पार्टनरकडून 15 लाखांची खंडणी घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. निखिल दर्यानाणी असे अपहरण झालेल्या हॉटेल व्यवसायिकाचे नाव आहे. विशेष म्हणजे बंदुकीचा धाक दाखवताच निखिल दर्यानाणी यांचे त्याच्याच गाडीत अपहरण करण्यात आले आहे. नाशिकच्या काठी गल्ली सिग्नलवर ही घटना घडली आहे.
नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु
अपहरण कर्त्यांना पैसे दिल्यानंतर स्वतः निखिल त्यांच्या तावडीतून पळून आला आहे. निखिलच्या अपहरणानंतर चार चाकी कार घेऊन पळालेल्या आरोपींनी दादासाहेब फाळके स्मारकाजवळ कार सोडून दिली आहे. या घटनेप्रकरणी नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अपहरणाचं नेमकं प्रकरण काय? याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. दरम्यान, हॉटेल व्यवसायिकाचे अपहरण करुन खंडणी मागणारे नेमके कोण होते? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिस अधिकचा तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून अपहरण करुन खंडणीच्या घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून अपहरण करुन खंडणीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच या प्रकरावरुन हाणामारी देखील होत आहे. यातूनच गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करत आहे. तसेच अशा घटनांमधील जे आरोपी आहेत. त्यांना चांगली शिक्षा देण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाकडून केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:


















