Donald Trump tariff Special Report :डोनाल्ड ट्रम्प यांचा जगावर 'टॅरिफ बॉम्ब' भारतावर 26 % आयात शुल्क
भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री दीडच्या सुमारास व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी जगभरातल्या १८० पेक्षा जास्त देशांना मोठा धक्का दिला. त्यात भारताचाही समावेश होता. ट्रम्प यांनी या देशांवर आयात शुल्क लादलं. ज्याचा उल्लेख गेल्या काही दिवसात ट्रम्प यांनी वारंवार केला होता. अखेर हे 'ट्रम्प टॅरिफ' लागू झालंच. या ट्रम्प टॅरिफचे जगासह भारतावर काय नेमके परिणाम होणार, पाहूयात या खास रिपोर्टमधून...
बुधवारी रात्री भारतातील जनता गाढ झोपेत असताना तिकडे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी रेसिप्रोकॉल टॅरिफ अर्थात आयात शुल्काची घोषणा केली.. तेही तब्बल २६ टक्के....
केवळ भारतच नव्हे तर ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊसमधून जगभरातील तब्बल १८० देशांसाठी आयात कराची घोषणा केली... तीही हा टॅरिफ बोर्ड हातात घेऊन...
महत्त्वाच्या बातम्या























