एक्स्प्लोर

Aaditya Thackeray on Shrikant Shinde : म्हणूनच ते मला कॉफी आणून द्यायचे, बालिश लोकं; आदित्य ठाकरेंचा पहिल्यांदाच श्रीकांत शिंदेंवर पलटवार

Aaditya Thackeray on Shrikant Shinde : लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ विधेयकावरून श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधला होता.

Aaditya Thackeray on Shrikant Shinde : लोकसभेत मंजूर झालेल्या वक्फ विधेयकावरून (Waqf Amendment Bill 2025)  महाराष्ट्रात शिंदेंच्या शिवसेनेकडून (Shiv Sena Shinde Faction) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ठाकरेंच्या काही खासदारांना विधेयकाच्या बाजूने मतदान करायचे होते, असं दावा शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी केला. तर मुस्लिम मतांच्या लांगुलचालनासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी केली होती. आम्ही इतके वर्ष हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन गेलो, बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेलो. बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जाऊन यांनी मतदान केलं. मी देखील शॉक झालो, सभागृह देखील शॉक झाले की उबाठा गटाचे खासदार असे कसे बोलू शकतात? मला वाटतंय ते समाजवादी पार्टीचे कोणी खासदार बोलताय की का? असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला होता. आता श्रीकांत शिंदे यांच्या टीकेवर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी पलटवार केलाय.  

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

आदित्य ठाकरे म्हणाले की, रंगावरून जात धर्म कळतो का? काही लोक बालिशपणे बोलतात. मला फालतू चर्चांवर  बोलण्यात अर्थ नाही. त्यांना जास्त महत्व नाही. त्यांना आम्ही महत्व देत नव्हतो, म्हणून ते कॉफी आणून द्यायचे, असा पलटवार त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केलाय. आता आदित्य ठाकरेंच्या टीकेवर श्रीकांत शिंदे काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

जमिनी बळकवण्याचा प्रयत्न 

वक्फ सुधारणा विधेयकाबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की, आता मुस्लिम समाजाला टार्गेट केले. काही दिवसांनी जैन समाज आणि इतर समाजाला देखील टार्गेट केले जाईल. जमिनी बळकवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे त्यांनी त्यांनी यावेळी केली. 

आदित्य ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ संभाजी शिंदे यांचा उल्लेख एसंशि असा केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. मला एसंशि म्हणाले, मग मी त्यांना युटी म्हणू का? युज ॲंड थ्रो? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला. याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले की, युज अँड थ्रो म्हणजे स्वतः पैसे खायचे आणि पळून जायचं. हात पाय मारण्याचा प्रयत्न एसंशी करत आहेत, असे प्रत्युत्तर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. 

हॉस्पिटलवर काय कारवाई करणार? याकडे आमचं लक्ष

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या (Dinanath Mangeshkar Hospital) आडमुठेपणामुळे तनिषा भिसे यांना प्राण गमवावे लागल्याचा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता आदित्य ठाकरे म्हणाले की,  हॉस्पिटलवर काय कारवाई करणार? याकडे आमचं लक्ष आहे. राजकारणात न जाता कारवाई कोण करतंय याकडे आमचं लक्ष आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून पाच वेळा फोन गेले. पण त्यांनी ऐकलं नाही, असे त्यांनी म्हटले आहे.  

आणखी वाचा 

Praful Patel on Sanjay Raut : संजय राऊतांनी माझ्या नादी लागू नको, Xगडा करीन म्हणताच प्रफुल्ल पटेलांकडून फक्त तीन शब्दात पलटवार; नेमकं काय म्हणाले?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसेवाटपाचे आरोप

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Shinde : शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अनिल शिंदेंच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली, थेट रुग्णालयात दाखल
शिवसेनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षांच्या घरी छापा, अनिल शिंदेंची प्रकृती बिघडली थेट रुग्णालयात दाखल
Raj Thackeray : मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा
Raj Thackeray : तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
तिघांना 15 कोटी, एकाला पाच तर एकाला एक कोटीची ऑफर; राज ठाकरेंनी कल्याण-डोंबिवलीतील उमेदवार समोर आणले
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसेवाटपाचे आरोप
Maharashtra Live Updates: आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पैसेवाटपाचे आरोप
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
देवेंद्र फडणवीसांनीही व्हिडिओ लावले, अदानींचे फोटो दाखवले; मुंबई विमानतळावरुन ठाकरे बंधूचं नवं घर काढलं
Devendra Fadnavis on Adani: गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? देवेंद्र फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
गौतम अदानींच्या साम्राज्याचा इतका झपाट्याने विकास का झाला? फडणवीसांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, म्हणाले...
Ganesh Naik : आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
आम्हाला छेडू नका, नादाला लागलात तर तुमची जागा दाखवणार; गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेंना इशारा
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना टोला
Embed widget