एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
79 ऑडिशन्समध्ये फेल, पण आता 9 वर्षांनी नशीब चमकलं, कष्टाचं फळ मिळालं; बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकीडची दणक्यात एन्ट्री
Yashvardhan Ahuja Debut: बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत आहे. अशातच आणखी एका वेगळ्या कारणानं गोविंदा चर्चेत आला आहे.
Bollywood Superstar Govinda Son Yashvardhan Ahuja Debut
1/12

सुपरस्टार गोविंदाचा मुलगा बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर या स्टारकिडला बॉलिवूडमध्ये पदार्पणाची संधी मिळाली आहे.
2/12

अनेकजण स्टारकीड्सना सगळं आयतं मिळतं, वैगरे वैगरे म्हणत ट्रोल करत असतात. पण, गोविंदाचा मुलगा मात्र त्याला अपवाद ठरला आहे.
3/12

तब्बल 9 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर गोविंदाच्या मुलाला पदार्पणाची संधी मिळाली आहे. 9 वर्षांत गोविंदाच्या मुलानं तब्बल 79 ऑडिशन्स दिले, पण त्याला सगळीकडून नकार मिळाला. अखेर त्याचं नशीब चमकलं असून लवकरच तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
4/12

गोविंदाचा मुलगा यशवर्धन अहुजाच्या डेब्यू चित्रपटाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. 9 वर्षांच्या मेहनतीनंतर यशवर्धनला त्याचा पहिला चित्रपट मिळाला आहे.
5/12

गोविंदा हा बॉलिवूडचा स्टार आहे. त्यानं आजवर अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण त्याच्यासारखी, त्याची मुलं स्टार बनू शकलेली नाहीत. 9 वर्षांच्या मेहनतीनंतर, गोविंदाच्या मुलाला त्याला हवी तशी भूमिका मिळाली आहे.
6/12

यशवर्धनने एका मुलाखतीत बोलताना त्याच्या बॉलिवूड डेब्यूबाबत खुलासा केला आहे. तो म्हणाला की, तो गेल्या 9 वर्षांपासून ऑडिशन देत आहे. पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी नकारच मिळाला.
7/12

यशवर्धननं टाईम्स इंटरनेटशी बोलताना त्याच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल सांगितलं. सुपरस्टारनं यशवर्धनला काय सल्ला दिला, हे देखील त्यानं सांगितलं आहे.
8/12

यशवर्धन म्हणाला की, माझ्या वडिलांनी कधीही ऑनस्क्रीन शिव्या दिलेल्या नाहीत. त्यानं मला फक्त चित्रपटांमध्ये शिव्या देऊ नकोस, असा सल्ला दिला आहे.
9/12

यशवर्धन पुढे म्हणाला की, त्यानं 100 वेळा ऑडिशन दिलं आणि त्यानंतरच त्याला ब्रेक मिळाला. मला 79 वेळा ऑडिशनमध्ये नाकारण्यात आलं आहे. मी 9 वर्षांपासून तयारी करत होतो.
10/12

आपल्या वडिलांबद्दल बोलताना यशवर्धन म्हणाला की, प्रत्येकाचा स्वतःचा प्रवास असतो. मी त्यांना कधीही स्क्रिप्ट पाठ करताना पाहिलं नाही. त्यांची स्मरणशक्ती खूप भारी आहे. त्यांचं टायमिंग एकदम सही आहे.
11/12

यशवर्धन पुढे म्हणाला की, डान्स आणि कॉमिक टायमिंगमध्ये त्यांना कोणीही हरवू शकत नाही. त्यांना पाहून मी खूप काही शिकलो आहे.
12/12

यशवर्धन नॅशनल अवॉर्ड विनर साई राजेश यांच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. त्यानं चित्रपटावर कामही सुरू केलं आहे.
Published at : 04 Apr 2025 02:13 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























