एक्स्प्लोर

फेसबुक लाईव्ह करत पतीचा खून, आता व्हॉट्सअपवरुन तेजस्वी घोसाळकरांना जिवे मारण्याची धमकी, मुंबईत खळबळ

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल व तेजस्वी यांना व्हॉटसअप ग्रूपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून व्हॉट्सअप ग्रुपवर आलेल्या मेसेजने खळबळ उडाली आहे. अभिषेक घोसाळकर यांची 1 वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे फेसबुक लाईव्ह करत अभिषेक घोसाळकर यांची हत्या करुन आरोपीने स्वत:देखील आपलं जीवन संपवलं होतं. या घटनेनं मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. आता, अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर करत धमकी देण्यात आली आहे. 'लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद', अशा आशयाचा हा मेसेज आहे. त्यामुळे, लालचंद हे अभिषेक घोसळकर हत्याप्रकरणातील साक्षीदार आहेत. त्यामुळे, तेजस्वी घोसाळकर यांनी याबाबत पोलिसात (Police) धाव घेत तक्रार दाखल केली आहे. लालचंद पाल यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास सुरू आहे. 

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार लालचंद पाल व तेजस्वी यांना व्हॉटसअप ग्रूपवरुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लालचंद पाल हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक असून अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्युसमयी ते घटनास्थळी होते. त्यामुळे, या खूनप्रकरणात ते प्रमुख साक्षीदार आहेत. त्यातच, आता गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर एका सदस्याने लालचंद व तेजस्वी यांना ठार मारण्याबाबतचा संदेश पोस्ट केल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. 

1 एप्रिल रोजी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज

लालचंद पाल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, मी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचा कार्याकर्ता असून सध्या मी शिवसेना शाखा क्रमांक .01, गणपत पाटील नगर या ठिकाणी कार्यालय प्रमूख म्हणून काम पाहात आहे. मी दिवंगत शिवसेना नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या सोबत काम करीत होतो. 08 फेब्रुवारी 2024 रोजी अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली तेव्हा मी त्यांचेसोबत होतो व सदरचे गुन्ह्यात मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब नोंदवलेला आहे. मात्र, त्याच अनुषंगाने 02 एप्रिल 2025 रोजी मला माझा मित्र रियाज याने सांगितले की, 1 एप्रिल 2025 रोजी गरीब नवाज नियाज कमिटी या व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज आल्याची माहिती दिली.  

मित्राने दिली माहिती

रियाज हा सदर व्हॉट्सअपचा सदस्य असल्याने त्याने हा ग्रुपवरील मेसेज पाहिला. त्यामध्ये, शरीफ नावाच्या व्यक्तीने दिवंगत अभिषेक विनोद घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand" असा मजकूर लिहून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे मला सांगितले, अशी फिर्याद लालचंद पाल यांनी दिली आहे. 

ग्रुपमध्ये नेमका मेसेज काय?

दरम्यान, मोहम्मद हबीब वलीउल्ला सुलेमानी (वय 33 वर्षे) व आबीद कासीम शेख, वय 30 वर्षे हे गरीब नियाज कमिटी या व्हॉट्सअप मोबाईल ग्रूपचे अॅडमीन आहेत. तसेच सदरचे मॅसेज हे नंतर ग्रुप मधून डीलीट केलेले आहेत. तरी शरीफने गरीब नवाज वॉटसअप ग्रुपवर अभिषेक घोसाळकर यांचा फोटो टाकून त्याखाली इंग्रजीमध्ये Lalchand inko Dekhkar Sudhar Ja, Isko biwi ko mat marva dena Lalchand असा मजकूर लिहून मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून माझी नमूद इसमाविरूदध कायदेशिर फिर्याद आहे, असे लालचंद पाल यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. 

हेही वाचा

पार्वती अन् सरस्वती सख्ख्या जावांचा मृत्यू, 2 अन् 4 वर्षांची लेकरं पोरकी; ट्रॅक्टर दुर्घटनेनं गावावर शोककळा, सरकारकडून 5 लाखांची मदत

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?

व्हिडीओ

Ram Shinde On Pawar | Nagpur | पवार कुटुंबीयांचा डान्स आणि राजकारणही एकत्र असतं - राम शिंदे
Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IndiGo flight cancellations: 1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
1650 उड्डाणांचे टार्गेट, 138 पैकी 137 डेस्टिनेशन पूर्ववत; आज रात्री 8 पर्यंत रिफंड; इंडिगो संकटावर 10 मोठे अपडेट्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Embed widget