इलेक्ट्रिक वाहनं स्वस्त होणार, सरकारनं आणली 500 कोटींची नवीन योजना; कधीपासून घेता येणार लाभ?
इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी (two wheelers) आणि तीन चाकी वाहनं (three wheelers) स्वस्त होणार आहेत.
Electric vehicles: इलेक्ट्रिक वाहनं (Electric vehicles) खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. इलेक्ट्रिक दुचाकी (two wheelers) आणि तीन चाकी वाहनं (three wheelers) स्वस्त होणार आहेत. कारण, यासाठी सरकारनं 500 कोटी रुपयांची नवीन योजना आणली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी EMPS योजनेसाठी 500 कोटी रुपये जारी करण्याची घोषणा केलीय. ही योजना 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
योजना 1 एप्रिलपासून लागू केली जाणार
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री वाढवण्यासाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे. 500 कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी गाड्या स्वस्त होणार आहेत. ही इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम (EMPS) योजना 1 एप्रिलपासून लागू केली जाणार आहे. ही योजना 4 महिन्यांसाठी वैध असणार आहे. दरम्यान, अवजड उद्योग मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, EMPS योजनेसाठी 500 कोटी रुपये जारी करण्यात आले आहेत. यामुळं देशातील इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वाहनांची विक्री वाढण्यास मदत होईल. फेब्रुवारी 2024 मध्ये, सरकारने FAME 2 (FAME-II) योजनेंतर्गत वाटप वाढवून 11500 कोटी रुपये केले होते. यापूर्वी या योजनेचे बजेट 10 हजार कोटी रुपये होते. 31 मार्च 2024 पर्यंत विकल्या जाणाऱ्या दुचाकी, तीन चाकी आणि कारवर हे अनुदान लागू असेल अशी माहिती अवजड उद्योग मंत्रालयानं दिली आहे.
इलेक्ट्रिक बस आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधण्यासाठी 4048 कोटी रुपये
फेम इंडिया योजनेंतर्गत, इलेक्ट्रिक टू, थ्री आणि फोर व्हीलरसाठी सबसिडी 7048 कोटी रुपये करण्यात आली आहे. त्यापैकी 5311 कोटी रुपये इलेक्ट्रिक दुचाकींसाठी होते. तसेच, इलेक्ट्रिक बस आणि ईव्ही चार्जिंग स्टेशन बांधण्यासाठी 4048 कोटी रुपये देण्यात आले. फेम इंडिया योजनेचा उद्देश देशातील ईव्ही आणि चार्जर्सना सबसिडी प्रदान करणे आहे. जेणेकरून त्यांची विक्री वाढू शकेल. याशिवाय, या योजनेत देशात ईव्ही पार्ट्सच्या निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाते.
इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली
दरम्यान, 2019 मध्ये सुरु झालेल्या FAME 2 अंतर्गत, आतापर्यंत सुमारे 12 लाख ईव्ही दुचाकी, 1.41 लाख तीन चाकी आणि 16,991 चारचाकी वाहनांना अनुदान देण्यात आले आहे. फेम 2 योजनेअंतर्गत 5,829 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अनुदान वितरित केले गेले आहे. त्यामुळेच काही काळापासून ईव्ही वाहनांची मागणी वाढली आहे. एका अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक, एथर एनर्जी आणि बजाज सारख्या मोठ्या कंपन्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. यामुळं बॅटरीवर चालणाऱ्या आणि पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकींच्या किंमतीतील तफावत कमी होण्यास मदत झाली आहे. याशिवाय, सरकारकडून मिळणारा पाठिंबाही इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या: