एक्स्प्लोर

Union Budget 2025: 30 हजारांपेक्षा कमी पगार, मग आता किती टॅक्स भरावा लागणार?; जाणून घ्या A टू Z माहिती

Union Budget2025: आतापर्यंत सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. मात्र आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली.

Union Budget2025: अर्थमंत्री निर्माला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (1 फेब्रुवारी) 2025-26 साठी अर्थसंकल्प (Union Budget 2025) सादर केला. मोदी सरकारने अर्थसंकल्प 2025-26 च्या माध्यमातून नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. पुढच्या आठवड्यात नवं आयकर विधेयक सादर करण्यात येणार आहे. त्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणांबद्दल माहिती देण्यात येईल. टॅक्स स्लॅबमधल्या बदलामुळे सरकारचा एक लाख कोटींचा महसूल घटणार आहे.  

आतापर्यंत सात लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होतं. मात्र आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली. आता 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. याचा अर्थ महिन्याला एक लाखापर्यंतच्या उत्पन्नाला कोणताच कर नसेल. म्हणजेच जर तुम्हाला महिन्याला 33 हजारांपेक्षा कमी पगार असल्यास कोणताच कर भरावा लागणार नाही.  तर महिना 33 हजारांपेक्षा जास्त पगार असल्यास तुम्हाला 5 टक्के कर भरावा लागेल. 

नव्या कररचनेतील बदल आणि फायदे 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नव्या कररचनेतील फेरबदल जाहीर केले. नव्या कररचनेत 0 ते  4 लाखांपर्यंत कोणताही कर नसेल. 4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के करण्यात आली आहे. 8 ते  12 लाख रुपयांपर्यंत 10 टक्के प्राप्तिकर आकारला जाईल. 12 लाख ते 16 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 15 टक्के प्राप्तिकर आकारला जाईल.  16 ते 20 लाख उत्पन्न असेल त्यांना 20 टक्के प्राप्तिकर द्यावा लागेल. तर, 20 लाख ते 24 लाख रुपयांचं उत्पन्न ज्यांचं असेल त्यांना 25 टक्के कर द्यावा लागेल. 24 लाखांपेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न असेल त्यांना 30 टक्के कर द्यावा लागेल. नव्या कररचनेनुसार ज्यांचं उत्पन्न  8 लाखांपर्यंत असेल त्यांना 30 हजारांचा फायदा होईल. 9 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असेल त्यांना 40 हजारांपर्यंत लाभ होईल. 10 लाख ज्याचं उत्पन्न असेल त्यांना 50 हजार रुपये, 11 लाख रुपये ज्याचं उत्पन्न असेल त्यांना 65 हजार, 12 लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना 80 हजराचांचा फायदा होईल.16 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना 50 हजार, 20 लाख रुपये उत्पन्न असेल त्यांना 90 हजार रुपये,  24 लाखांचं उत्पन्न असेल त्यांना वार्षिक 1, 10,000 हजारांचा फायदा होईल. 

मोदी सरकारची मोठी घोषणा; कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स?

0 ते 4 लाख - Nil
4 ते 8 लाख- 5 टक्के
8 ते 12 लाख - 10 टक्के
12 ते 16 लाख - 15 टक्के
16 ते 20 लाख - 20 टक्के
20 ते 24 लाख - 25 टक्के
24 लाखापुढे - 30 टक्के

संबंधित बातमी:

Union Budget 2025: केंद्रीय अर्थसंकल्प सादर, निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी चादरीआड बळजबरीनं फरफटत नेलं, अखेर राहुल गांधींची प्रतिक्रिया आली!
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
Ketan Agarwal Death Case: केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
केतन अग्रवालला जाऊन आज एक महिना पूर्ण, परिवारानं घातलं दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं, मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून केला नवस
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
बदलापुरातील नारायणा स्कुल बेकायदेशीर, शाळेला शिक्षण विभागाचा झटका; अध्यक्षांसह मुख्याध्यापकावर गुन्हा
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी वेगळे विषय होत आहेत, देशविरोधी ताकद एकत्र येत आहे : धनंजय महाडिक
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
Crime News: सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
सहा वर्षांपूर्वी केलं लव्ह मॅरेज, पुन्हा बसवाल्याच्या प्रेमात पडली अन् पतीचा घात केला, दुधात झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत विषारी साप... मिनिटा-मिनिटाला असा रचला थरारक कट
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
NEET निकालावर गंभीर प्रश्नचिन्ह; बीडच्या सोहमला अवघे 95 गुण, अँसर कीनुसार 500 मार्क्सची अपेक्षा, कुटुंबीयांस शॉक
Embed widget